milkman (2).jpg 
नाशिक

चर्चा तर होणारच...'या' तरुणाची आयडियाची कल्पना लय भारी! कसे ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (सटाणा) कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र सोशल डिस्टन्सचा अवलंब केला जात आहे. मात्र दूध घेण्याकरीता येत असलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवून दूध देणे कठीण होत असतांना सटाणा येथील एका पदवीधर युवकाने सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करण्याकरीता अनोखी शक्कल लावून दूध वाटप सुरू केले आहे. यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये सोशल डिस्टन्स देखील पाळला जात आहे. या युवकाच्या या अविष्कारची मात्र गावात चांगलीच चर्चा होत आहे. 

अन् त्याची आयडिया ठरली भारी

नवे निरपूर (ता. बागलाण) येथील करण सूर्यवंशी याने नोकरी मिळत नाही, म्हणून कर्ज काढून दुग्धव्यवसाय सुरू केला. चार म्हशी व दोन गायी विकत घेऊन त्याने दोन वर्षांपासून दूध विक्री सुरू केली आहे. रोज पहाटे चारला उठून शेतातील गायी-म्हशींचे दूध घेऊन आल्यानंतर डेअरीवर सकाळी साडेसहा व सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दूध विक्री करीत होता. यातच कोरोनाचे संकट आल्यावर डेअरीवर वेळेत न पोहणाऱ्या ग्राहकांना दूध देणे अडचणीचे ठरत असल्याने त्याने यावर उपाय म्हणून करणने घरपोच सेवा देण्याचे ठरविले. मात्र कोरोनावर मात करण्याकरीता सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांना कळविले. म्हणून यावर मात करत ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवून दूध देण्याकरीता त्याने एक शक्कल शोधून काढली आणि त्याची अंमलबजावणी केली. या तरूणाचा अविष्कार यशस्वी ठरला. 

दूध विक्रीचा प्रयोग चांगलाच भारी

सोशल डिस्टन्सचे पालन करण्याकरीता करने मोटारसायकलला आठ ते दहा फूट लांब प्लॅस्टिकची नळी बांधून नळीच्या एका टोकाला असलेल्या नरसाळ्यात मागणीप्रमाणे करणने दूध टाकायचे व नळाच्या दुसऱ्या टोकाला दुधाचे भांडे लावण्याचे सांगितले. 
करणचा लॉकडाऊनमधील हा दूध विक्रीचा प्रयोग चांगलाच चर्चिला जात आहे. यामुळे दोन ग्राहकांमध्ये एक मीटर सामाजिक अंतर ठेवून एकमेकांना कुठेही स्पर्श होणार नाही व सामाजिक अंतरही राखले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT