Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Nashik News : सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा! उपायुक्तांकडून 10 दिवसांची मुदतवाढ

Nashik : पोलिस आयुक्तालयाने बजाविलेल्या तडीपारीच्या नोटिसप्रकरणी अंशत: दिलासा मिळाला असून, उपायुक्तांनी त्यांना दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खंदेसमर्थक व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना शहर पोलिस आयुक्तालयाने बजाविलेल्या तडीपारीच्या नोटिसप्रकरणी अंशत: दिलासा मिळाला असून, उपायुक्तांनी त्यांना दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यान तडीपारीच्या कारवाईपासून त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. सुधाकर बडगुजर यांना २०१४ मधील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (10 days extension to Sudhakar Badgujar by Deputy Commissioner )

परंतु याविरोधात बडगुजर यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. याच प्रकरणात शहर परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी चौकशी करून बडगुजर यांना तडीपारी करण्यासंदर्भातील नोटीस ९ तारखेला बजावली होती. त्यासंदर्भात बडगुजर यांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली होती. (latest marathi news)

त्यानुसार, शनिवारी (ता. १८) बडगुजर यांनी उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेत, त्यांना उच्च न्यायालयातून कागदपत्रे मिळाले नाहीत, त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार, उपायुक्त राऊत यांनी त्यांना येत्या २७ तारखेपर्यंत संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

बडगुजर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख असून, ऐन लोकसभा निवडणुकीचा काळात यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजाविल्याने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT