Tree Enumeration esakal
नाशिक

Tree Enumeration : वृक्षगणनेसाठी 10.34 कोटीच्या खर्चाला मंजुरी! नव्याने वृक्षसंपदा मोजणार; 50 लाख वृक्षांचा अंदाज

Latest Nashik News : या वर्षात नवीन वृक्षांची गणना समोर येऊन मागील वृक्षगणनेनुसार वृक्षसंपदेमध्ये वाढ झाली की घट हेदेखील समोर येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी (ता. ८) झालेल्या महासभेमध्ये वृक्षगणनेसाठी १०.३४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षात नवीन वृक्षांची गणना समोर येऊन मागील वृक्षगणनेनुसार वृक्षसंपदेमध्ये वाढ झाली की घट हेदेखील समोर येणार आहे. (10 half crore expenditure approved for tree enumeration)

महापालिकेच्या उद्यान विभागाने २०१६ मध्ये वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई येथील मे. टेरेकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले गेले. २५ लाख वृक्षसंपदा असेल असे गृहीत धरून त्यावेळी मंजुरी दिली. त्यासाठी प्रतिवृक्ष साडेआठ रुपयांप्रमाणे दोन कोटी १३ लाख ७५ हजार रुपये संबंधित कंपनीला दिले जाणार होते.

परंतु शहरात २५ ऐवजी ४९ लाख वृक्ष असल्याची आकडेवारी समोर आली. २५ लाख वृक्षगणना झाल्यानंतर उर्वरित वृक्ष गणना करण्यासाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र तशी मंजुरी न घेता वृक्षगणना पूर्ण केली. महाराष्ट्र पोलीस अकादमी तसेच लष्करी हद्दीतील वृक्षगणना करण्यास सुरक्षेच्या कारणावरून नकार देण्यात आला.

संबंधित संस्थेकडून ४९ लाख वृक्षगणनेचे देयके सादर करण्यात आले. यामध्ये १.९० कोटींचे अतिरिक्त देयके सादर करण्यात आले. मात्र अतिरिक्त देयके देण्यास महासभेने नकार दिला व सदर वाद न्यायालयात पोचला. न्यायालयानेही निविदेतील अटी-शर्तींचा विचार करून मक्तेदाराला अतिरिक्त देयके अदा करणे योग्य नसल्याचा निकाल दिला. हा वाद अद्यापही कायम आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक असल्याने नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला. यंदाचा प्रस्ताव हा १०.३४ कोटींचा आहे. (latest marathi news)

शहरात ५० लाख वृक्ष

२०१६ मध्ये वृक्षगणनेसाठी प्रतिवृक्ष साडेआठ रुपये दर दिला. परंतू नवीन गणनेत २७.७० रुपये प्रतिवृक्ष असा किमान दर संकेतस्थळावर प्राप्त झाल्याने त्यानुसार ५० लाख वृक्षांसाठी १०.३४ कोटी रुपयांचे प्राकलन तयार करून त्यास मंजुरी घेण्यात आली. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर महापालिकेकडून दर मागविल्याचा दावा उद्यान विभागाकडून करण्यात आला.

मागील वृक्षगणना ४९ लाख वृक्षसंपदेवर थांबली होती. त्यापेक्षा अधिक वृक्ष झाल्याचा अंदाज गृहीत धरून शहरात ५० लाख वृक्ष असतील. त्यानुसार वृक्षगणनेचे काम देण्यात आले असून, मागील वाद लक्षात घेऊन वाढीव कामाचे प्राकलन तयार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT