swine flu esakal
नाशिक

Nashik News : स्वाइन फ्ल्यूचा दहावा बळी

Nashik : निफाड तालुक्यातील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील स्वाइन फ्लूंच्या बळींचा आकडा दहापर्यंत पोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यातील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील स्वाइन फ्लूंच्या बळींचा आकडा दहापर्यंत पोचला आहे. मागील महिन्यापासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उपचारासाठी शहरी भागात रुग्ण दाखल होत असल्याने महापालिका अलर्ट मोडमध्ये आली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाइन फ्लूचे २३ रुग्ण आढळले होते. एप्रिल महिन्यात जेल रोड येथील एका डॉक्टरचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. (10 persons died in swine flu in niphad district )

मे महिन्यात सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिलेला व मालेगाव येथील ६५ वर्षी व्यक्ती तसेच २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. निफाड येथील ६८ वर्षीय महिला व कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला व जेल रोड भागातील एका सेवानिवृत्त एअर फोर्स कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. दिंडोरीतील ४२ वर्षीय महिला व चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील एका पन्नास वर्षे व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.

आता निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने २० जूनला मृत्यू झाला. मृत रुग्णाचा स्वाइन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान जिल्ह्यात ६० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जून महिन्यात मागील २५ दिवसात स्वाइन फ्लूचे पाच तर ग्रामीण भागात एक नवीन रुग्ण आढळला. नाशिक शहरातील स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा ३५ वर पोचला आहे. दरम्यान नाशिक शहरात स्वाइन फ्लूची परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Amalner Crime : विवाहित असताना, दुसऱ्यांदा बोहल्यावर! ‘सीआरपीएफ’ कर्मचाऱ्याचा प्रताप; महिलेच्या शस्रक्रियेवेळी उघड झाला प्रकार

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

SCROLL FOR NEXT