MAHAGENCO News esakal
नाशिक

Nashik MAHAGENCO: महानिर्मितीतर्फे 15 मेगावॉटच सौर वीज खरेदी-विक्री करार; साक्री-1 प्रकल्पातील विजेबाबत प्रथमच करार

Nashik MAHAGENCO: १५ मेगावॉट क्षमतेचा वीज खरेदी-विक्री करार मेसर्स एसईझेड बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (वीज वितरण परवानाधारक) यांच्या समवेत करण्यात आला.

नीलेश छाजेड

Nashik MAHAGENCO : औष्णिक वीज उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य अशा महानिर्मिती कंपनीने वीज उत्पादनासोबतच वीज वितरण क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून, धुळे जिल्ह्यातील महानिर्मितीच्या २५ मेगावॉट स्थापित क्षमतेच्या ‘साक्री-१ सौरऊर्जा’ प्रकल्पाची वीज वितरण करण्यासाठी १५ मेगावॉट क्षमतेचा वीज खरेदी-विक्री करार मेसर्स एसईझेड बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (वीज वितरण परवानाधारक) यांच्या समवेत करण्यात आला. ()

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, मुख्य अभियंता (सौरऊर्जा) संजय कुऱ्हाडे, महाव्यवस्थापक हर्षल भास्करे, तर एसईझेड बायोटेक (सायरस पुनावाला ग्रुप)तर्फे कार्यकारी संचालक केदार गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना येरमाळकर (इरो पॉवर) यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

महानिर्मितीतर्फे प्रथमच खासगी वीज वितरण परवानाधारक संस्थेसमवेत हा वीज विक्री करार करण्यात आला आहे. महानिर्मितीने मेसर्स एसईझेड बायोटेकच्या मांजरी एसईझेड ६ मेगावॉट आणि हडपसर एसईझेड ९ मेगावॉटकरिता निविदा स्पर्धेत सहभागी होऊन ही निविदा जिंकली. मे. एसईझेड बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मांजरी आणि हडपसर या दोन्ही एसईझेडकरिता महानिर्मितीकडून ही वीज खरेदी-विक्री केली जाणार आहे. (latest marathi news)

या करारासाठी एसईझेड बायोटेक (सायरस पुनावाला ग्रुप)तर्फे इरो पॉवर या वितरण प्रणाली ऑपरेटर कंपनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एसईझेड बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही मांजरी आणि हडपसर या दोन्ही एसईझेडची विकासक असून, येथे सिरम इन्स्टिट्यूटसारख्या अग्रगण्य लस उत्पादक कंपन्यास्थित आहेत.

आठ हजार मेगावॉट वाढीचे उद्दिष्ट

वाढते औद्योगिकीकरण, लोकसंख्या, तापमानवाढ आणि निसर्गाची अवकृपा लक्षात घेता महानिर्मितीने औष्णिक वीज उत्पादनाकडून आता नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत आठ हजार मेगावॉट प्लस क्षमता वाढ करण्याचा निश्चय केला आहे. त्याकरिता सौरऊर्जा, पवनऊर्जा, उदंचन जलविद्युत प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, कोल गॅसिफिकेशन, सरकुलर इकॉनॉमीसारखे अभिनव उपक्रम तथा ऊर्जा प्रकल्प विषयक कामांना प्राधान्य देऊन गती देण्यासाठी महानिर्मिती प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT