Urea Fertilizer esakal
नाशिक

Nashik Fake Fertilizer : बनावट खत विक्रेते रडारवर; कृषी विभागातर्फे 17 पथके

Fake Fertilizer : प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाला सुरवात झाल्यानंतर बनावट रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fake Fertilizer : प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाला सुरवात झाल्यानंतर बनावट रासायनिक खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय सतरा पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी जास्त दराने खते खरेदी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात पाच लाख ६७ हजार ४९२ हेक्टरवर (८८.४३ टक्के) पेरणी झाली आहे. (17 teams by Agriculture Department on fake fertilizer dealers radar of police)

पिकाच्या वाढीसाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गेल्या आठवड्यात अचानक युरियाच्या मागणीत वाढ झाल्याने काही दिवसांसाठी युरियाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र रासायनिक खत विक्रेत्यांनी तयार केले. यातून जास्त दराने विक्रीचा प्रयत्न काही ठिकाणी झाला. परंतु पुरवठा सुरळीत होताच कृत्रिम टंचाई संपुष्टात आली आणि पाऊसही कमी झाला. परिणामी, आता रासायनिक खतांची मागणी मर्यादित प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यात कुठेही तुटवडा जाणवत नाही.

पण टंचाईच्या नावाखाली बनावट खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे चौकशी पथक नियुक्त केले आहे. जिल्हा व विभाग स्तरावर एक समिती स्थापन करुन जिल्ह्यातील खतांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले जात आहे. या पथकाने विल्होळी येथील विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

''जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा शिल्लक असल्यामुळे कृत्रिम टंचाईच्या नावाखाली खतांची जास्त दराने विक्री करत असल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. शेतकऱ्यांनी जास्त दराने खते खरेदी करू नये. तशी विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा.''-अभिजित जमधडे, मोहीम अधिकारी, जि.प. नाशिक

जिल्ह्यातील खतसाठा (आकडे टनामध्ये)

खत.......मागणी.........पुरवठा.......शिल्लक साठा

यूरिया....एक लाख......४७३४८.......३४८५२

डीएपी....२६ हजार......८०३९.........६४५२

एमओपी...५ हजार.......७६९...........३९४०

एसएसपी...३१ हजार....१०१३९.......१५४७०

कॉम्प्लेक्स...९६ हजार.....४४९४०......६१५३२

अ.सल्फेट.....२ हजार......००............०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT