drowning death esakal
नाशिक

Nashik News : शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

Nashik : चुंचाळे शिवारातील भोर टाउनशिप परिसरातील शेततळ्यात बुडून दोन सातवर्षीय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : चुंचाळे शिवारातील भोर टाउनशिप परिसरातील शेततळ्यात बुडून दोन सातवर्षीय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत अशरफ अक्रमखान व इर्शाद शाह यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सातपूर-अंबड लिंक रोडवरील अंबिका संकुल परिसरात राहणारी चार समवयस्क मुले दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. खेळता खेळता ती भोर टाउनशिप परिसरातील सुमारे २० एकरच्या क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या १०० बाय २०० मीटर लांबी असलेल्या शेततळ्याजवळ पोहोचली. ( 2 children died after drowning in farm )

चौघांपैकी अशरफ व इर्शाद यांनी तळ्याच्या पाठीमागील बाजूने तारेच्या कंपाउंडमधून प्रवेश केला. शेततळे उंचावर असल्याने त्यांनी कसरत करत शेततळ्याचे टोक गाठले, मात्र तेथून घसरल्याने ते पाण्यात पडल्याने त्यांच्या पाठीमागे असलेल्या दोन्ही मुलांनी घराकडे पळ काढून ते पाण्यात पडल्याची माहिती दिल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शेतीच्या परिसरात शेततळे असल्यामुळे जेसीबीद्वारे शेततळ्यातील पाणी काढण्यासही अडथळा येत होता.

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात उतरलेल्या स्थानिक युवकांना मार्गदर्शन केल्यानंतर चार तासांत अर्ध्या तासाच्या फरकाने सायंकाळी साडेसातला दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अशरफचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर इर्शादचे वडील आयुर्वेदिक औषधांची विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT