Grape Harvest Festival esakal
नाशिक

Grape Harvest Festival : नाशिकमध्ये 2 दिवस ग्रेप हार्वेस्ट महोत्सव

Grape Harvest Festival : द्राक्ष व वाइन यांचे ‘ब्रॅण्डींग’ करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने 'नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्‍हल'चे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Grape Harvest Festival : ‘ग्रेपसिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये उत्पादित होणारी द्राक्ष व वाइन यांचे ‘ब्रॅण्डींग’ करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने 'नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्‍हल'चे आयोजन केले आहे. शनिवार (ता.२४) आणि रविवारी (ता.२५) हॉटेल एमराल्ड पार्क (ग्रीन व्‍ह्‍यू) येथे हा दोन दिवसीय महोत्‍सव पार पडेल. (nashik Grape Harvest Festival marathi news )

याअंतर्गत सहल, स्‍पर्धा, सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्‍सवात ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह, द्राक्ष बागांना भेटी तसेच द्राक्षाचा विविध जाती बघण्याची संधी मिळेल. तसेच नाशिकमधील काही प्रसिद्ध वायनरीना भेट देता येईल.

महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग (काढणी), द्राक्षाच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन तसेच पॅकेजिंग बघता येईल. तसेच द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय, पदार्थ तसेच वाइन टेस्ट घेण्याची संधी मिळेल.

द्राक्ष खरेदीसह आकर्षक खेळ आणि लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टची व विविध खाद्य चाखण्याची पर्वणी उपलब्ध असेल. यावर्षी सलग दुसऱ्यांदा हा कार्यक्रम होत आहे. महोत्‍सवात सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT