free books scheme esakal
नाशिक

Nashik School First Day : निफाडमधील 224 शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके! नवागतांचे होणार जंगी स्वागत

Nashik News : शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पुस्तके दिली जातात.

माणिक देसाई

निफाड : तालुक्यातील २२४ प्राथमिक शाळांमध्ये नवागतांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने नियोजनदेखील करण्यात आले असून पहिल्याच दिवशी नवागतांच्या हातात पुस्तके देखील मिळणार असली तरी गणवेशासाठी मात्र वाट पहावी लागणार आहे. (224 schools in Niphad will get books on first day)

नवीन शैक्षणिक सत्रात १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी निफाड तालुक्यातील सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत.

यात निफाड तालुक्यात ४३,९१२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पुस्तके दिली जातात. दरम्यान, निफाड तालुक्यातील ३७ शाळांना पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मंजुरी शासनाने दिली असून त्यातील नऊ शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असले तरी निफाड तालुक्यात १२ केंद्रप्रमुख, तीन विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक ५१ तर पदवीधर शिक्षक ४६, उपशिक्षक ४८ इतकी पदे रिक्त असून त्यामुळे याचा परिणाम निश्चित जाणवणार आहे. तालुक्यामध्ये ११० शिक्षकांनी विनंती बदल्यांचे अर्ज दाखल केले आहे. त्याचे संकलन करून कार्यवाही करणार असल्याचे शिक्षण विभागाने कळवले आहे. दरम्यान, यंदा शाळेचा पहिला दिवस हटके करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. (latest marathi news)

रिक्त पदे

केंद्रप्रमुख -१२

विस्तार अधिकारी- ३

मुख्याध्यापक - ५१

पदवीधर - ४६

उपशिक्षक रिक्त - ४८

विनंती बदली अर्ज - ७०

पहिली ते आठवीसाठी संच -४३९१२

शाळा दुरुस्तीची मंजुरी- ३७

शाळा दुरुस्त - ९

"तालुक्यातील २२४ मुख्याध्यापकांची बैठक घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रानुसार शाळा प्रवेशाचे नियोजन केले. एक आगळा वेगळा प्रवेश उत्सव साजरा करीत जि.प. शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी तालुक्यात शालेय समिती आणि पालकांच्या मदतीने प्रयत्न करणार आहोत."- डॉ. विजय बागुल, गटशिक्षण अधिकारी, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT