swine flu esakal
नाशिक

Nashik Swine Flu Update : शहरात 24 स्वाइन फ्लू रुग्ण! खासगी रुग्णालयांना आकडेवारी देणे बंधनकारक

Nashik News : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा स्वाइन फ्लूची सज्जता केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Swine Flu Update : शहरामध्ये एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूने पुन्हा तोंड वर काढले असून, बाधित रुग्णांचा आकडा २३ झाला आहे. त्याचबरोबर ग्रामीणमध्येदेखील १८ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहे. स्वाइन फ्लूने शहरात एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा स्वाइन फ्लूची सज्जता केली आहे. (Nashik 24 swine flu patients in city)

स्वाइन फ्लूसह डेंगी रुग्णांची आकडेवारी खासगी रुग्णालयांना देणे बंधनकारक केले आहे. शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. मागील तीन वर्षात कोरोना महामारी प्रादुर्भावाने नाशिककरांना त्रासून सोडले होते.

वर्षभर कोरोनाचे रुग्ण आढळले नसले तरी या वर्षी रुग्ण वाढताना दिसतं आहे. एप्रिल महिन्यात बदलते वातावरण स्वाइन फ्लूच्या साथीला निमंत्रण देणारे ठरले आहे. वर्षाच्या सुरवातीलाच स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला. जानेवारीत दहा संशयित आढळले होते.

एप्रिल व मे महिन्यात स्वाइन फ्ल्यू रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळले. जेल रोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला. सध्या शहरात खासगी रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लूचे तीन अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. (Latest Marathi News)

ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी रुग्ण दाखल होत आहे. ग्रामिण भागातून पाच रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्ल्यूमुळे पाच मृत्यू झाले आहेत. सिन्नरमधील दातली गाव, निफाड, कोपरगाव येथील प्रत्येकी एक, तर मालेगाव येथील दोघांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला.

शहरात स्वाइन फ्लूच्या आजारावर उपचार घेत असलेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले. स्वाइन फ्लू लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Free Health Services : मोफत उपचारांसाठी नागरिकांची गर्दी; कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा वाढता विश्वास

Kolhapur Black Spots : निम्मे शहर, ‘ब्लॅक स्पॉट’चा कहर; वाहनधारकांच्या जीवाशी खेळ, किरकोळ उपाय; जीव गेल्यानंतरच हालचाली

Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT