Kundlik Pandharinath Mengal
Yuvraj Dhondiba Mengal
Sandeep Somnath Agaville
Kundlik Pandharinath Mengal Yuvraj Dhondiba Mengal Sandeep Somnath Agaville esakal
नाशिक

Nashik Accident News : नांदूर-शिंगोटे लोणी रस्त्यावर अपघातात 3 ठार; कंटेनर मोटरसायकल अपघात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. सदरच्या अपघातात कंटेनर व पळटसर मोटरसायकलच्या अपघातात हे तीन तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली. ()

सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे अपघात स्थळी पोचून सदरचा कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला.

सदरच्या अपघातामध्ये नांदुर-शिंगोटे येथील वाशी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वय वर्ष ३० व युवराज धोंडीबा मेंगाळ वय वर्ष २९ हे दोघेही राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर व संदीप सोमनाथ आगविले राहणार गर्दनी तालुका अकोले हे तिघे मोटरसायकलने जात असताना कंटेनर क्रमांक जी जे १५ ए व्ही ६६५६ व पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच १५ एच के ५३०४ यांचा अपघात झाला.

दोन्ही वाहनांची जोरदार दडप झाल्यामुळे मोटरसायकल वरील तिघेही व्यतप्राण झाले. या अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेऊन त्वरित बचाव कार्य केले मात्र सदरचे तिन्ही तरुण जागेवरच ठार झाले असल्याची माहिती मिळाली. सदरचा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातामध्ये तिघेही तरुण जागीच ठार झाले.

रविवारी सकाळी नांदूर शिंगोटे येथे दोघांवर व एकावर गर्दनी येथे अंतिम संस्कार करण्यात आले अत्यंत दुःखद अंतकारणाने आदिवासी बांधवांना ही वेळ आली. आदिवासी पाड्यातील हे तिघेही तरुण यामध्ये ठार झाल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नेहमीच अपघात घडत असतात सदरचा रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अनेक दिवसाची मागणी असूनही याकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक तरुणांना लहान-मोठे अपघातांमधून आपले प्राण गमावण्याची वेळ येत आहे तेव्हा त्वरित हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT