Pune University esakal
नाशिक

Pune University : स्‍वयंमूल्‍यांकन अहवालासाठी 31 ची डेडलाईन; पुणे विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना सूचना

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्‍न महाविद्यालयांना स्‍वयंमूल्‍यांकन अहवाल (सेल्‍फ अप्रायझल रिपोर्ट) सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्‍न महाविद्यालयांना स्‍वयंमूल्‍यांकन अहवाल (सेल्‍फ अप्रायझल रिपोर्ट) सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. हा अहवाल सादर करण्यासाठी प्राचार्यांना शुक्रवार (ता. ३१)ची डेडलाईन देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वास्‍तुशास्‍त्र, औषधनिर्माणशास्‍त्र, व्‍यवस्‍थापनशास्‍त्र, विधी, शिक्षणशास्‍त्र व शारीरिक शिक्षणशास्‍त्र आदी व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या महाविद्यालयांसाठी ही सूचना जारी केली आहे. ( 31st deadline for self evaluation report Pune University notice to all colleges )

त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीच्‍या संलग्‍नता, मान्‍यता, नैसर्गिक वाढ सुरू ठेवण्याच्‍या किंवा नूतनीकरणाच्‍या मान्यतेसाठी स्‍वयं मूल्‍यमापन अहवालाद्वारे माहिती सादर करण्यास सांगितले आहे. स्‍वयंमूल्‍यमापन अहवालाबरोबर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांचे मान्‍यतेचे पत्र, बार कौन्‍सिल ऑफ इंडिया यांचे मागील वर्षाचे अभ्यासक्रम मान्‍यतेचे आदेश, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे मान्‍यता आदेश आदींसह संबंधित शिखर परिषदांचे अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता मान्‍यतेची प्रत विद्यापीठ कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. (latest marathi news)

अधिस्‍वीकृती अभिकरणाच्‍या मानकांनुसार अधिस्वीकृती किंवा पुनःअधिस्‍वीकृती मिळण्यासाठी पात्र महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्‍यांकन व अधिस्‍वीकृती परिषदेकडून किंवा राष्ट्रीय अधिस्‍वीकृती मंडळाचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाकडून घेण्यात येणारा निर्णय महाविद्यालयांवर बंधनकारक राहील, असेही स्‍पष्ट केले आहे.

...तर जबाबदारी प्राचार्यांची

अहवाल सादर करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, तसेच स्‍वयंमूल्‍यमापन अहवाल भरणार नाहीत, त्‍याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची असणार आहे. त्‍याचप्रमाणे स्‍वयंमूल्‍यांकन अहवालातील माहिती भरून झाल्यावर अहवालात सुधारणा करण्यासाठी लिंक उपलब्‍ध होणार नाही, असेही कळविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill : वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT