Women removing the water in the house with a bucket. Shop, and water in the ATM. esakal
नाशिक

Nashik Heavy Rain Damage : येवल्यात 35 वर घरे, दुकानांत पाणी; मोठे नुकसान

Heavy Rain Damage : बुधवारी रात्री आठला सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सकाळी सहापर्यंत धो धो पडत होता.

सकाळ वृत्तसेवा

येवला : बुधवारी रात्री आठला सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात गुरुवारी (ता. २६) सकाळी सहापर्यंत धो धो पडत होता. दहा तासांत तब्बल ८९ मिलिमीटर पावसाची शहरात नोंद झाली असून, पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडविली. विविध भागांतील ३५ वर घरे व दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरातही पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने शहर धुवून काढले. (35 Houses and shops under heavy rain )

सलग तिसऱ्या दिवशी रात्री पाऊस कोसळला. सकाळी आठला संपलेल्या ४८ तासांत तब्बल १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरासह तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्याचवेळेस पूर्व भाग अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शहरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने पाणीच पाणी केले किंबहुना बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सर्वच रस्त्यांना नदीचे रूप आले होते.

शहरात बुधवारी सायंकाळी साडेसातनंतर पावसाने धुव्वाधार बरसण्यास सुरुवात केली. सुमारे दोन- अडीच तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. रात्रीही कमी अधिक पडणारा पाऊस पहाटे पुन्हा मुसळधार कोसळला. रात्रभर चाललेल्या पावसाने शहराच्या सकल भागात सर्वत्र पाणी साचून नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वाधिक हाल हुडकोवासियांची झाले. या भागात नाल्याचे पाणी शिरून २० ते २५ घरांमध्ये तळे साचले.

परिणामी, नागरिकांची प्रचंड हाल झाले. घरातील संसारोपयोगी साहित्यही पाण्यात भिजले. कपडे, अन्नधान्यही खराब झाल्याने रात्री बारापर्यंत नागरिक बादलीने घरातील पाणी बाहेर काढत होते. या वेळी नागरिकांनी प्रशासनाविषयी अतिशय संतापजनक भावना व्यक्त केल्या. पावसाने बाजार समितीसमोर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. या रस्त्याने वाहने चालवणेही जिकरीचे झाले होते. या ठिकाणी असलेले एटीएमही पाण्यात गेले होते. (latest marathi news)

विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी गुडघ्या इतके पाणी साचून या भागातील चार ते पाच दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लक्कडकोट अन्‌ बुरुड गल्लीतील पाबळे वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसून अनेक कुटुंबीयांचे नुकसान तर झालेच परंतु पावसामुळे हाल देखील झाल्याने रात्रजागून काढावी लागली. येवला बसस्थानक, स्वामी मुक्तांनद विद्यालयाचे क्रीडांगण, कोर्ट रोड, विंचूर चौफुली आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

शनिपटांगण भागातही नदीसारखे पाणी वाहत होते. पावसाने शहराची दुरवस्था केल्याने पालिकेसह प्रशासनाविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करत दिखाऊ मोहीम राबविण्यापेक्षा घरात जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातही कमी अधिक प्रमाणात धो-धो पाऊस पडल्याने प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आले. मका, कांदा रोपे व सोयाबीन या पिकांची वाताहात होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

दरम्यान, पूर्व भागातील नगरसूल व अंदरसूल मंडलात ४५ मिलिमीटर, तर राजापूर मंडलात २३ मिलिमीटर पाऊस झाला. या भागात अल्प पावसाने शेत शिवार भिजले असले तरी नद्या-नाले, जलस्रोत अद्यापही कोरडेच आहेत. अजूनही या भागात विहिरींना पाणी आलेले नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

असा पडला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

(सकाळी आठपर्यंतची नोंद)

मंडल-मंगळवार-बुधवार-एकूण

येवला-४८-८९-१३७

अंदरसूल-२६-७२-९८

नगरसूल-१०-४१-५१

पाटोदा-४९-७८-१२७

सावरगाव-११-५४-६५

जळगाव नेऊर-१६-५२-६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT