Police esakal
नाशिक

Nashik Police : राज्यात 449 सहाय्यक निरीक्षकांच्या पोलिस निरीक्षक पदोन्नतीने बदल्या

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकपदावरील ४४९ अधिकाऱ्यांच्या पोलिस निरीक्षकपदी पदोन्नतीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकपदावरील ४४९ अधिकाऱ्यांच्या पोलिस निरीक्षकपदी पदोन्नतीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पदोन्नतीने बदल्या केल्याने अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गेल्या काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. (449 assistant inspector have been transferred by promotion to police inspector in state)

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील ४४९ सहाय्यक निरीक्षकांची पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती करतानाच बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, नाशिक शहर आयुक्तालयात एक, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर एक अशा दोघांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तसेच नाशिक शहर व ग्रामीणमधून नऊ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये तिघे रुजू होणार आहेत. पदोन्नती झालेल्या पोलिस निरीक्षकांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. (latest marathi news)

- नाशिकला आले : कीर्ती पाटील (बीडीडीएस, नाशिक), योगेश राजगुरू (जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक),

- नाशिकमधून बाहेर : राजू पठाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुजित ठाकरे (ना.ग्रा.मधून पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला), सचिन जाधव (मुंबई), नीता कायटे (ना.ग्रा.मधून मुंबई शहर), उमा गवळी (मुंबई शहर), नितीन खैरनार (मुंबई शहर), रामचंद्र कर्पे (ना.ग्रा.मधून लोहमार्ग, मुंबई), दत्तात्रय लांडगे (ना.ग्रा.मधून मुंबई शहर), सारिका थोरात (मुंबई शहर)

- पोलिस अकादमीत : जगदीश पवार (जालना), चारू भारती (नवी मुंबई), मनीषा जाधव (राज्य गुप्तवार्ता, ठाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT