नाशिक

वृक्ष गणनेला नकार

CD
पन्नास लाखांचा टप्पा पार करूनही अडथळा ५९४ संस्थांकडून वृक्षगणनेच्या पथकाला प्रवेश नाकारला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : हरित शहराच्या दिशेने वाटचाल करताना नाशिकने ५० लाख वृक्षांचा टप्पा पार केला आहे. असे असतानाही शहरातील तब्बल ५९४ शासकीय आस्थापना, उद्योग आणि खासगी मालमत्ताधारकांनी वृक्षगणनेच्या पथकाला आपल्या हद्दीत प्रवेश नाकारला आहे. महापालिकेकडून २०१६ मध्ये टेरेकॉन कंपनीमार्फत वृक्षगणना केली होती. त्यानंतर यंदाची गणना मे. ऑरनेट टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आली आहे. ५० लाख वृक्ष अपेक्षित धरून या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मक्तेदार कंपनीने आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण केले असून, शहरात ५० लाखांहून अधिक वृक्ष आढळून आले आहेत. या गणनेत प्रत्येक वृक्षाची प्रजाती, वय, खोडाची रुंदी, उंची नोंदवून जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. मात्र, गणना अंतिम टप्प्यात असताना सीएनपी, आयएसपी प्रेस, वन विभाग, तोफखाना केंद्र, बोरगड यासारख्या केंद्र सरकारच्या संवेदनशील आस्थापनांसह अनेक खासगी उद्योग आणि संस्थांनी सुरक्षेचे कारण देत पथकाला मज्जाव केला आहे. त्यामुळे या परिसरातील वृक्षगणना रखडली आहे. ------ कोट ------ या संस्थांना गणनेसाठी सहकार्य करण्याबाबत उद्यान विभागाकडून पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. दर सहा वर्षांनी वृक्षगणना बंधनकारक आहे. त्यानुसार नेमलेल्या कंपनीमार्फत काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या ५९४ संस्थांनी परवानगी नाकारली आहे, त्यांना आम्ही पत्र दिले असून लवकरच ही गणना पूर्ण केली जाईल. - विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका. ------------ परवानगी नाकारलेली विभागनिहाय आकडेवारी पंचवटी - २०० सिडको - ११२ सातपूर - ९९ पूर्व - ९८ नाशिक रोड- ४९ पश्चिम- ३६ एकूण - ५९४. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार लकी! पुढील ६ दिवसांत नोकरी, पैसा अन् व्यवसायात मोठा लाभ

Kaygaon News : ज्ञानोबांच्या भेटीसाठी अमळनेरहून निघाली भक्तीची पायी वारी; टाळ मृदुंगाच्या गजरात आळंदी दिंडीचे प्रस्थान

PCMC Water Crisis : भामा-आसखेड योजनेतून वाढीव पाण्याची प्रतीक्षा; पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची टँकरवरील अवलंबित्वातून सुटका कधी?

Indapur News : भाजप ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार; माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत घोषणा

SCROLL FOR NEXT