Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray office bearers were kept under house arrest in the background of Prime Minister Narendra Modi's meeting. esakal
नाशिक

Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

Nashik : मोदींच्या सभेत यापूर्वी त्यांनी दिलेल्या विविध आश्‍वासनांबाबत लोकशाही मार्गाने जाब विचारण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या पाच पदाधिकाऱ्यांना निफाड पोलिसांनी अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कांद्याने केलेल्या शेतकऱ्यांच्या वांद्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता. १५) पिंपळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत यापूर्वी त्यांनी दिलेल्या विविध आश्‍वासनांबाबत लोकशाही मार्गाने जाब विचारण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या पाच पदाधिकाऱ्यांना निफाड पोलिसांनी अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार करीत ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी खंडू बोडके-पाटील, विक्रम रंधवे यांनी पोलिसांकडे केली होती. या सर्व घडामोडी बघता पोलिसांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील.

तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना ताब्यात घेतले. (latest marathi news)

निफाडचे पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, सायखेड्याचे पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांनी अज्ञानस्थळी नजरकैदेत ठेवत स्थानबद्ध केले आहे.

दरम्यान, माजी आमदार अनिल कदम यांनी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्याशी याबाबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT