LLB esakal
नाशिक

LLB CET Exam : 5 वर्षे कालावधीच्‍या एलएलबी सीईटीच्‍या नोंदणीस 30 पर्यंत मुदतवाढ!

Nashik News : विधी शाखेतील पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधी शाखेतील पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. या वाढीव मुदतीनुसार येत्‍या शनिवार (ता. ३०)पर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. (nashik 5 years LLB CET registration marathi news)

वेगवेगळ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जात असतो. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध सीईटी परीक्षा टप्प्‍याटप्प्‍याने होत आहेत. काही सीईटींसाठी नोंदणीप्रक्रिया सध्या सुरू आहे. विधी शाखेत बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.

गेल्‍या १८ जानेवारीपासून सीईटीच्‍या नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली होती. यानंतर पहिल्‍यांदा १८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. पुन्हा एकादा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्‍यानुसार आता पात्रताधारक विद्यार्थ्यांना ३० मार्चपर्यंत संकेतस्‍थळावरून नोंदणी करताना परीक्षा शुल्‍क भरता येणार आहे. (latest marathi news)

१७ मेस सीईटीचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेच्‍या अभ्यासक्रमाचा तपशील संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिला आहे. सराव चाचणी परीक्षेची सुविधादेखील उपलब्‍ध केली आहे. पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा १७ मेस घेण्याचे नियोजित आहे. या दिवशी राज्‍यभरात संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा पटल्यास भाजपात प्रवेश करेन- संजय राऊत

अल्फाच्या सेटवर आलियाच बॉबी देओलसोबत खरंच भांडण झालेलं? अभिनेता खुलासा करत म्हणाला....'त्यावेळी अनेक गोष्टींकडे मी...'

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

SCROLL FOR NEXT