water esakal
नाशिक

Nashik News : महिनाभरात 502 नळजोडण्या खंडित

Nashik : आर्थिक वर्षे पूर्ण होत असताना थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कर विभागाकडून नळजोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आर्थिक वर्षे पूर्ण होत असताना थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कर विभागाकडून नळजोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. एका महिन्यात ५०२ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, थकबाकी न भरता तोडलेले नळ जोडल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. शहरात घरपट्टी वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. (Nashik 502 taps broken in month by nmc marathi news)

परंतु दुसरीकडे पाणीपट्टी वसुली असमाधानकारक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व विविध कर विभागाने थकीत पाणीपट्टीधारकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. शहरात २ लाख ९ हजार नळजोडणी आहे. त्यातील ४४ हजार ३८५ नळजोडणीधारकांकडे ९५.७५ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात महापालिकेने २२ फेब्रुवारीपासून कारवाई सुरू केली आहे.

थकबाकी असलेल्या नळजोडणी खंडित केली जात आहे. महिनाभरात ५०२ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. थकबाकी अदा केल्यानंतर जोडण्या पूर्ववत केल्या जाणार आहेत. थकबाकी अदा न करता परस्पर नळजोडणी केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. (latest marathi news)

विभागनिहाय कारवाई

विभाग खंडित नळजोडणी

सिडको २००

सातपूर ११६

नाशिक रोड ९३

पंचवटी ८१

पूर्व ०६

पश्चिम ०६

''थकीत पाणीपट्टी वसुल करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत ५०२ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.''- संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT