Death News esakal
नाशिक

Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू; टोकाचे पाऊल, अपघाताच्या घटना, अकस्‍मातची नोंद

Latest Nashik News : यापैकी काही प्रकरणे टोकाचे पाऊल, अपघाताची आहेत. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये अकस्‍मात मृत्‍यूची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा करुण अंत झाल्‍याची बाब पोलिस दप्तरी नोंदविली गेली आहे. यापैकी काही प्रकरणे आत्‍महत्‍या, अपघाताची आहेत. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये अकस्‍मात मृत्‍यूची नोंद झाली आहे. (6 people died in different incidents)

विषारी औषध घेतलेल्‍या चेहेडीतील महिलेचा मृत्‍यू

चेहेडी येथील महिलेने घरीच विषारी औषध सेवन केल्‍याने तिच्‍यावर उपचार सुरु होते. यादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला आहे. नमिता सुदान धोंगडे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. त्‍यांनी १५ सप्‍टेंबरला सकाळी नऊच्‍या सुमारास घरात विषारी औषधाचे सेवन केल्‍याचे आढळले.

यानंतर भाऊ राहुल उकडे यांनी त्‍यांना बिटको रुग्‍णालयात दाखल केले असता, प्रकृती अत्यवस्थ असल्‍याने तेथून जिल्‍हा रुग्‍णालयात हलविले. दरम्‍यान त्‍यांच्‍यावर उपचार सुरु असताना गुरुवारी (ता.१९) दुपारी दोनच्‍या सुमारास डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

डीजीपीनगर दोनमध्ये युवतीची आत्‍महत्‍या

अंबड येथील डीजीपी नगर २ येथील साईव्‍हीला अपार्टमेंटमधील २५ वर्षीय युवतीने आत्‍महत्‍या केली. वैष्णवी रामनाथ मोरे असे मृत युवतीचे नाव आहे. गुरुवारी (ता.१९) पहाटेच्‍या सुमारास तिने फॅनच्‍या हुकला दोरीच्‍या सहाय्याने गळफास घेतला. भाऊ किरण मोरे याने तिला पुढील उपचारासाठी जिल्‍हा रुग्‍णालयात नेले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. अंबड पोलिस ठाण्यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद झाली आहे.

दुचाकी घसरून चालकाचा मृत्‍यू

दुचाकी घसरून जखमी झालेल्‍या चालकाचा उपचारादरम्‍यान गुरुवारी (ता.१९) सकाळी सव्वा आठच्‍या सुमारास मृत्‍यू झाला. चेतनानगर येथील कृष्ण मंदिराजवळ झालेल्या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सुरेश नागपुरे (वय ३१) असे आहे. ते मंगळवारी (ता.१७) दुचाकीने पाथर्डीफाटा येथून घरी जाताना, सेवनहेवन समोर दुचाकी घसरली होती. या अपघातात त्‍यांना गंभीर दुखापत झाल्‍याने पुढील उपचारासाठी वडील मुरहरी नागपुरे यांनी जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. जखमीवर उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. (latest marathi news)

पहिल्‍या मजल्यावरून पडून कारागिराचा मृत्‍यू

गंगापूर रोडवरील शिरीन मेडोज येथील एका इमारतीत काम करणाऱ्या कारागिराचा पहिल्‍या मजल्यावरून पडून मृत्‍यू झाला. अमीत अशोक जगझाप (वय ३५, रा. हनुमानवाडी, पंचवटी) असे मृताचे नाव आहे. अमित गुरुवारी (ता.१९) सायंकाळी सातच्‍या सुमारास इमारतीत काम करताना वीस फूट उंचीवरून तोल जाऊन पडला. यात त्‍याच्‍या डाव्‍या पायाला, कमरेला, चेहऱ्याला दुखापत झाल्‍याने उपचारार्थ श्रीगुरुजी रुग्‍णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

श्‍वास घेण्यास त्रास; ज्‍येष्ठाचा घरात मृत्‍यू

नाशिकः महाजन नगर येथील रहिवासी दिलीप भिकनराव ढोले हे ऋषिकेश (उत्तराखंड) येथून देवदर्शन करून घरी परतले होते. यादरम्‍यान त्‍यांना घरी होऊ लागल्‍याने व छातीत दुखू लागल्‍याने पुढील औषधोपचारासाठी मुलगा अमोल ढोले यांनी जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. यावेळी डॉक्‍टरांनी तपासून दिलीप ढोले यांना मृत घोषित केले.

ओडिशातील व्‍यक्‍ती आढळली मृतावस्‍थेत

ओडिशातील भानूपूर (पो. पंचुपंल्‍ली, बालीयापल) येथील व्‍यक्‍ती महामार्ग बसस्‍थानकाच्‍या कडेला मृतावस्‍थेत आढळली आहे. प्रदीपकुमार बन्‍सीदरा मोहंटी (वय ४०) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (ता.१९) सकाळी नऊच्‍या सुमारास ते बेशुद्ध अवस्‍थेत आढळल्‍यानंतर पोलिस कॉन्‍सटेबल सदगीर यांनी खासगी रुग्‍णवाहिकेतून त्‍यांना औषधोपचारासाठी जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. यावेळी डॉक्‍टरांनी संबंधिताला तपासून मृत घोषित केले. मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद घेतली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT