Unseasonal Rain Crop Damage esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: जिल्ह्यातील 729 हेक्टरला अवकाळीचा फटका! नैसर्गिक संकटाचा 107 गावांमधील 3518 शेतकऱ्यांना झळ

Nashik News : चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १०७ गावांतील ७२९ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain Damage : चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १०७ गावांतील ७२९ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक संकटाची तीन हजार ५१८ शेतकऱ्यांना झळ बसली आहे. (Nashik 729 hectares of district affected by unseasonal rain news)

एप्रिलच्या मध्यावर नाशिक जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या वर पोचला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा बसत असताना सोमवारी (ता. १५) सुरगाणा, बागलाण, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण आदी भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांना बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक संकटात एकूण १०७ गावे बाधित झाली. या गावांमधील तीन हजार ५१८ शेतकऱ्यांना फटका बसला. (latest marathi news)

तालुकानिहाय विचार करता सुरगाणा तालुक्यात ६८ गावे (दोन हजार ७७३ शेतकरी), त्र्यंबकेश्वर ३२ गावे (६३७ शेतकरी) आणि पेठ तालुक्यातील सात गावे (१०८) बाधित झाली. नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

सुरगाण्यात सर्वाधिक नुकसान

सुरगाणा तालुक्यात पिकांसोबत अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. पेठ तालुक्यात वीज पडून गोपाळ महाले यांची म्हैस मृत्युमुखी पडली. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी पावसात घरांसह पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील बहुतांश भाग दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे ६४९ हेक्टरवरील आंबा, ७१.९० हेक्टरवरील कांदा आणि ८.४० हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT