PWD esakal
नाशिक

Nashik PWD APP: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲपवर 745 तक्रारी! खड्ड्यांच्या ऑनलाइन तक्रारीस वर्षभरात नागरिकांचा अल्प प्रतिसाद

Latest Nashik News : वर्षभरात अवघ्या ७४५ तक्रारी नाशिक विभागातून प्राप्त झालेल्या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी ४३७ तक्रारी नाशिक जिल्ह्यातील व उर्वरित ३०८ तक्रारी धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यातील आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik PWD APP : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या महामार्गावरील खड्ड्यांबाबत ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, वर्षभरात अवघ्या ७४५ तक्रारी नाशिक विभागातून प्राप्त झालेल्या आहेत. प्राप्त तक्रारींपैकी ४३७ तक्रारी नाशिक जिल्ह्यातील व उर्वरित ३०८ तक्रारी धुळे, जळगाव, नगर जिल्ह्यातील आहे. (745 complaints on PWD app)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार ऑनलाइन अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन तक्रार केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय खड्डे दुरुस्त करतील आणि ७२ तासांच्या आत अँड्रॉइड ॲपद्वारेच उत्तर देण्यात येईल. अशा प्रकारची खड्डे तक्रार निवारण प्रणाली (पीसीआरएस) विकसित करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणात रस्ते नाशिक विभागात आहे. या सर्व रस्त्यांची नियमितपणे देखभाल- दुरुस्ती केली जाते. मात्र, पावसानंतर रस्त्यात खड्डे पडतात. त्यामुळे विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यांच्या तक्रारी निराकरण करण्यासाठी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रणाली विकसित केली होती. (latest marathi news)

तक्रारदारांना मिळणार माहिती

ॲपमधून खड्ड्यांचा फोटो अपलोड केल्यानंतर तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सदर खड्डा कुठे आहे ते लक्षात येईल. तक्रार केल्यानंतर त्यावर काय कारवाई झाली आहे, या संबंधित सद्यस्थिती एसएमएसद्वारे सूचितही केली जाते.

तक्रार सोडविताना सात दिवसापर्यंतच्या विलंबावर उपअभियंता व १५ ते ३० किंवा त्यापेक्षा अधिक तक्रारीस विलंब झाला तर अनुक्रमे अधीक्षक अभियंता व प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांद्वारे पंधरा दिवसानंतर ही तक्रार का सोडली गेली नाही ? याचे पुनर्विलोकन केले जाते.

"सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण विविध पातळ्यांवर केले जाते. बांधकाम विभागाच्या रस्त्यावर जर खड्डा आढळल्यास नागरिकांनी ॲपद्वारे आम्हाला कळवावे."- प्रशांत औटी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT