Central Railway cargo
Central Railway cargo esakal
नाशिक

Central Railway News : मध्य रेल्वेकडून 89.24 दशलक्ष टन मालवाहतूक! 9446 कोटीचा महसूल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : रेल्वेला प्रवासी गाड्यापेक्षा मालवाहतूक गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो. या वर्षी मालवाहतुकीत मध्य रेल्वेने प्रभावी कामगिरी केली असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आतापर्यंतची सर्वोत्तम ८९. २४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आणि ९४४६ कोटी रुपये महसूल मिळवून ९ टक्क्यांची वाढ झाली. (Nashik 89 million tonnes of cargo from Central Railway news)

मध्य रेल्वेने २०२३-२४ (एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४) या आर्थिक वर्षात मालवाहतूक लोडिंगमध्ये प्रभावी कामगिरी दाखवली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ८९.२४ दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग केली असून मागील वर्षाच्या ८१.८८ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत ९ टक्के वाढ नोंदवली आहे.

मार्च-२०२४ मध्ये ९. ४ दशलक्ष टन मालवाहतूक केली, तर मार्च-२०२३ मध्ये ८. ६९ दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली होती. ४.०२ टक्के वाढीसह हा मार्च महिन्यातील आतापर्यंतचा सर्वोत्तम मालवाहतुकीचे आकडा आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८९.०५ दशलक्ष टन मालवाहतुकीचे लक्ष्य ही ओलांडले आहे.

उल्लेखनीय मालवाहतूक कामगिरीमधून मध्य रेल्वेला ९४४६ कोटी रुपयांचा मूळ मालवाहतूक महसूल मिळवता आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात १२ टक्के वाढ झाली आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १००७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

विकासाच्या बाबतीत ७५ दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतूक कामगिरीत मध्य रेल्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेट टन किलोमीटर (एनटीकेएम), जे प्रतिकिलोमीटर वाहून नेले जाणारे एक टन पे लोड आहे, त्यातही मागील वर्षाच्या तुलनेत ८.१ टक्के वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या अथक परिश्रमातून, सर्व मालवाहतूक कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा राखण्यात यशस्वी झाली आहे. आणि यामुळे मालवाहतुकीच्या कामगिरीत लक्षणीय वाढ साध्य करू शकली आहे.  (latest marathi news)

लोडिंगमधील वाढ:

गेल्या वर्षीच्या १५१४ रेकच्या तुलनेत १९२७ स्टीलचे रेक (२७.३ टक्के)

गेल्या वर्षी १०२० रेकच्या तुलनेत ॲटोमोबाईल्सचे ११७८ रेक (१५.५ टक्के)

गेल्या वर्षी ९७३९ रेकच्या तुलनेत १०,६३९ कोळशाचे रेक (९.२ टक्के)

अधिकची वाढ

लोह अयस्क - ३५.४ टक्के

आरएमएसपी (पोलाद प्लांटसाठी कच्चा माल) ३५.१ टक्के

लोह आणि पोलाद – २८.९ टक्के

सिमेंट- २१.६ टक्के

ऑटोमोबाईल - १३ टक्के

कोळसा -९.४ टक्के

कंटेनर -६.२ टक्के

खत - १.५ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT