The ongoing work of the beneficiary Dinkar Jadhav's home. esakal
नाशिक

Nashik News : कळवण तालुक्यात 946 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर! स्वप्नातलं घर साकार होणार

Nashik : तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना, अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकुल योजना, तर ओबीसी प्रवर्गाकरिता प्रधानमंत्री आवास योजना शासनाने सुरू केली असल्याने लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे.

रवींद्र पगार: सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना, अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकुल योजना, तर ओबीसी प्रवर्गाकरिता प्रधानमंत्री आवास योजना शासनाने सुरू केली असल्याने लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही केली जात असल्याने गोरगरिबांना स्वप्नातील घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (nashik rightful house in Kalwan taluka marathi news)

९४६ लाभार्थी कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे. कळवण तालुक्यात एकूण १५१ महसुली गावे असून, सुमारे ८६ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावात विकासकामे सुरू आहेत. सार्वजनिक कामासह वैयक्तिक कामांचेही लाभ शासनाच्या माध्यमातून दिले जात असल्याने पात्रता पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास घरकुल योजनेत ३२, अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजनेतून ६३२, तर ओबीसी प्रवर्गाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेतून २८२ असे एकूण ९४६ लाभार्थ्यांचे उद्दीष्ट पंचायत समितीला दिले आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातून मोदी आवास योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देत पुढील प्रक्रिया तत्काळ सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९४६ गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे. (latest marathi news)

टप्प्याटप्प्याने अनुदान थेट खात्यावर

कळवण तालुक्यात अनेक नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर नसल्याने मातीसह कुडाच्या घरात राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल आवास योजना, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शबरी घरकुल आवास योजना, तर ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट बँक खात्यावर घराचे हप्ते टप्प्याटप्प्याने वर्ग केले जाणार आहे.

■ रमाई घरकुल आवास योजना (अनुसूचित जाती) : ३२

■ शबरी घरकुल आवास योजना (अनुसूचित जमाती) : ६३२

■ प्रधानमंत्री आवास योजना (ओबीसी प्रवर्ग) : २८२

■ या वर्षात मंजुरी मिळालेली एकूण घरे : ९४६

''शासनाच्या सुरू केलेल्या रमाई ‌आवास योजना, शबरी‌ आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घरे मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या घराचे काम पूर्ण करावे.''- डॉ.निलेश पाटील, गटविकास अधिकारी, कळवण

''एकही आदिवासी बांधव घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी महायुती सरकार प्रयत्नशिल आहे. शबरी घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगीकारले असून, धोरणात बदल करुन प्रत्येक गरजूला घर देण्याचे ठरविले आहे.''- नितीन पवार, आमदार, कळवण-सुरगाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT