cow esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव बाजार समितीतून 97 गोवंश जनावरे जप्त

Nashik : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.१७), मंगळवारी (ता. १८) या दोन दिवसांमध्ये गोवंश जातीचे जनावरे आढळली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.१७), मंगळवारी (ता. १८) या दोन दिवसांमध्ये गोवंश जातीचे जनावरे आढळली. पोलिसांनी जनावरे जप्त करून दाभाडी येथील गो- शाळेत पाठविली. पोलिस व गो-रक्षकांच्या समयसूचकतेमुळे बकरी ईदच्या पूर्वसंध्येलाच संबधित मालक जनावरे बाजार समितीत सोडून बेपत्ता झाल्याची चर्चा येथे होत आहे. शहरात बकरी ईदनिमित्त गोवंश जनावरांची खरेदी विक्री होत असल्याचा आरोप गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला होता. (97 animals seized from Malegaon market committee )

शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची तक्रार गोरक्षकांनी केली होती. बाजार समितीतील जनावरांच्या बाजारावर कॅम्प पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. कानाला बिल्ले असलेली जनावरेच विक्रीसाठी आणण्याचे आवाहन समितीचे उपसभापती विनोद चव्हाण शेतकरी व व्यापाऱ्यांना केले होते. सोमवारी येथे ८८ तर मंगळवारी ९ गोवंश जनावरे बाजार समितीत आढळून आली.

पोलिसांनी बाजार समितीच्या उपसभापती चव्हाण यांना विचारणा केली असता या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात बकरी ईदमुळे ९७ गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याचा बेत अयशस्वी ठरला. त्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. कॅम्प विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. ९७ जनावरे कोठून व कशी आली व कोणाच्या मालकीची आहेत या संदर्भात अजून तपास लागलेला नाही.

जप्त केलेली जनावरे ३४ लाख ३१ हजार रुपये किंमतीची आहेत. या जनावरांना दाभाडी येथील श्री गोशाळा पांजरापोळ येथे पाठविण्यात आले आहे. सोमवारी (ता.१७) दुपारी बारा ते एकच्या सुमारास तर मंगळवारी (ता.१८) सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जाविद खाटीक यांनी तपासणी केली असता सर्व जनावरे उपाशीपोटी असल्याचे आढळून आले. दरम्यान सोशल मीडियावर श्री. गुंजाळ यांच्यासह पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. अज्ञात जनावर मालकांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT