Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरातून 3 अल्‍पवयीन मुलींचे अपहरण; वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये पालकांकडून गुन्‍हा दाखल

Nashik News : शहरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन अल्‍पवयीन मुलींना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्‍याचे उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात घडलेल्‍या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन अल्‍पवयीन मुलींना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्‍याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेताना कायदेशीर रखवालीतून पळवून नेणाऱ्या अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्‍हा दाखल केला आहे. पहिल्‍या घटनेत गेल्‍या २७ एप्रिलला सकाळी सव्वासातला विकास मधुकर मते यांनी त्‍यांच्‍या पंधरावर्षीय भाचीला पंचवटी एक्‍स्‍प्रेसमध्ये बसविले होते. (Nashik Abduction of 3 minor girls from city)

मात्र त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास अमृतधाम भागातील के. के. वाघ महाविद्यालयाकडून जात असताना त्‍यांची भाची काळ्या रंगाच्‍या गाडीवर अनोळखी मुलासोबत दिसून आली. याप्रकरणी त्‍यांनी आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेताना भाचीचे अपहरण झाल्‍याची फिर्याद दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत पंधरावर्षीय मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्‍याची फिर्याद महिलेने अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे. सारिका कृष्णा शिंदे यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार त्‍यांची पंधरावर्षीय मुलीला बुधवारी (ता. ८) सायंकाळी पाचच्‍या सुमारास सिडकोतील साईबाबानगर येथून कशाचे तरी आमिष दाखवत कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्‍याचे नमूद केले आहे.

तिसऱ्या घटनेत नाशिक रोड भागातील सुभाष रोड, पवार वाडी येथून सतरा वर्षे ८ महिने वय असलेली अल्‍पवयीन मुलगी बेपत्ता झालेली आहे. तिचे वडील मेहबूब शेख यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार बुधवारी (ता. ८) रात्री साडेअकराच्‍या सुमारास त्‍यांची मुलगी ही बाथरुमला जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली.

परंतु ती पुन्‍हा न परतल्‍याने घरच्‍यांनी तिचा शोध घेतला असता, ती सापडून आली नाही. यानंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत कुणीतरी फूस लावून तिचे अपहरण करत पळवून नेल्‍याचे फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

School Ragging Case : सरकारी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या डोक्याचे केस, भुवया ब्लेडने कापल्या; रॅगिंगच्या धक्कादायक प्रकाराने पालघर हादरले

'लाज कशी वाटत नाही' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चाहत्यांनी केलं गैरवर्तन, धक्काबुक्कीला वैतागून जोरात ओरडली, viral Video

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या मुखेडमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित; नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभा

SCROLL FOR NEXT