NMC Tax Recovery esakal
नाशिक

Nashik NMC Tax Recovery : शहरातील दोन हजारांवर थकबाकीदारांना ‘अभय’! महापालिकेकडून 1.44 कोटी थकीत करवसुली

Latest Nashik News : थकबाकीदारांना ९१ लाख रुपयांची दंड माफी मिळाली. त्या व्यतिरिक्त महापालिकेच्या कर विभागाकडे थकीत रक्कमेचा दिसत असलेला फुगवटादेखील कमी होण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC Tax Recovery : महापालिका कर विभागाने घरपट्टीच्या थकबाकीदारांसाठी लागू केलेल्या अभय योजनेत पहिल्या एक आठवड्यात दोन हजार ६९ थकबाकीदारांना लाभ देताना कर विभागाने १.४४ कोटी थकीत कर वसुल केला आहे. थकबाकीदारांना ९१ लाख रुपयांची दंड माफी मिळाली. त्या व्यतिरिक्त महापालिकेच्या कर विभागाकडे थकीत रक्कमेचा दिसत असलेला फुगवटादेखील कमी होण्यास सुरवात झाली आहे. (Abhay yojana to over two thousand arrears in city)

मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असले तरी शंभर टक्के करवसुली होत नाही. हेदेखील वास्तव आहे. घरपट्टी किंवा मालमत्ता कर शंभर टक्के वसूल होण्यासाठी २०१६ पासून त्रैमासिक कर सवलत योजना लागू केली.

त्यात एप्रिल महिन्यात एकरक्कमी मालमत्ता कर अदा केल्यास आठ टक्के, तर मे महिन्यात पाच टक्के व जून महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली. त्याचबरोबर सौरऊर्जेवर चालणाऱ्या साधनांचा वापर केल्यास व ऑनलाइन कर अदा केल्यास एक टक्का सवलत आहे.

कर सवलत योजनेत २ लाख ३६ हजार ३९६ मिळकतधारकांनी शंभर कोटी २५ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत या वर्षी जमा केले. जून महिन्यात कर सवलत योजना संपुष्टात आली. त्यामुळे आता मिळकतधारकांना मालमत्ता थकबाकी भरताना दरमहा दोन टक्के शास्ती लागू होणार आहे.

त्यासाठी सव्वादोन लाख थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याची तयारी करण्यात आली. थकबाकीवरदेखील अभय योजना लागू करण्याच्या सूचना शासनाच्या होत्या. त्यानुसार ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात माफीची ५ टक्के रक्कम अदा केल्यास ९५ टक्के माफी, डिसेंबर महिन्यात १५ टक्के माफीची रक्कम भरल्यास ८५ टक्के माफी तर जानेवारी २०२५ मध्ये २५ टक्के माफीची रक्कम अदा केल्यास ७५ टक्के शास्ती माफी योजना लागू करण्यात आली. योजनेंतर्गत पहिल्याच आठवड्यात फायदा दिसून येत आहे. (latest marathi news)

४५५ कोटींची थकबाकी

मालमत्ता अर्थात घरपट्टीची एकूण १७३ कोटी रुपये मुळ थकबाकी आहे. त्यावर २७२ कोटी रुपयांचा दंड आहे. त्यामुळे एकूण थकबाकी ४४५ कोटी रुपये दिसते. थकबाकीवर दोन टक्के शास्ती असल्याने रक्कम वाढली आहे. वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना थकबाकीची रक्कमेचा फुगवटा दिसतो अभय योजनेतून फुगवटा कमी होणार आहे.

अभय योजनेची स्थिती (रक्कम लाखात)

विभाग लाभार्थी थकबाकीदार दंड माफी एकूण थकबाकी जमा

सातपूर २४१ ३ १८

पश्चिम १०१ १७ १६

पूर्व ३७६ ३३ २९

पंचवटी ५०१ १६ ३४

सिडको ५३४ १३ २७

नाशिकरोड ३१६ १० २०

-------------------------------------------------------------------

एकूण २०६९ ९१ १४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT