Pharmacy esakal
नाशिक

Pharmacy Admission: फार्मसीची प्रवेशक्षमता, मान्‍यता रोखली! उच्च व तंत्रशिक्षण विभाग, DTEकडून विद्यापीठांना पत्राद्वारे माहिती

Nashik News : करिअरचा चांगला पर्याय म्‍हणून औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील अभ्यासक्रमांना गेल्‍या काही वर्षांपासून विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद वाढता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. ५ः राज्‍यात औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमाच्‍या नवीन संस्‍था, प्रवेशक्षमता वाढ तसेच नवीन अभ्यासक्रमास मान्‍यता देण्यात येऊ नये, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केल्‍या आहेत. नवी दिल्‍लीतील फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडिया यांच्‍या पत्राचा संदर्भ देत या सूचना जारी केलेल्‍या आहेत. विभागाच्‍या या सूचनेविषयीची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यापीठांना पत्र पाठवत कळविली आहे. (Nashik Access to pharmacy accreditation prevented marathi news)

करिअरचा चांगला पर्याय म्‍हणून औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील अभ्यासक्रमांना गेल्‍या काही वर्षांपासून विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद वाढता आहे. त्‍यामुळे पदविका, पदवी अशा सर्व स्‍तरावरील अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी चांगलीच चुरस बघायला मिळते.

विद्यार्थ्यांकडून वाढता प्रतिसाद लक्षात घेता, शैक्षणिक संस्‍था व महाविद्यालयांकडून प्रवेश क्षमता वाढीचे तसेच नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील प्रस्‍ताव सादर केले जात होते. परंतु आता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्‍यात औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमाच्‍या नवीन संस्‍था, प्रवेश क्षमता वाढ तसेच नवीन अभ्यासक्रमास परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्‍या आहेत.

त्‍यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व अकृषिक विद्यापीठाच्‍या कुलसचिवांना तसेच लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाच्‍या कुलसचिवांना पत्र पाठवताना याबाबत कळविले आहे. यासंदर्भात फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियातर्फे १२ फेब्रुवारीस पाठविलेल्‍या पत्राचा संदर्भ दिलेला आहे. (Latest Marathi News)

शुक्‍लकाष्ट काही संपेना..!

यापूर्वी जिपॅट परीक्षा उत्तीर्णांना पदव्‍युत्तर पदवीसाठी दिले जाणारे विद्यावेतन बंद झाल्‍याने विद्यार्थी मेटाकुटीला आलेले आहे. राज्‍यभर यासंदर्भात संघर्ष सुरु असताना अद्यापही हा प्रश्‍न सुटलेला नाही. अशा स्‍थितीत औषधनिर्माणशास्‍त्र शाखेपुढे आणखी एक आव्‍हान उभे ठाकले असून, या शाखेचे शुक्‍लकाष्ट काही संपेना अशी स्‍थिती निर्माण झालेली आहे.

सादर प्रस्‍तावही रखडले

नवीन संस्‍था, प्रवेशक्षमता वाढ तसेच नवीन अभ्यासक्रमास मान्‍यता न देण्याबाबत पत्रात नमूद केले आहे. तसेच फार्मसी कौन्‍सिलचे निर्देश विचारात घेता औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासासंदर्भात विभागीय कार्यालयाकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्‍या प्रस्‍तावांवरही कार्यवाही करू नये, अशा स्‍पष्ट सूचना दिल्‍या असल्‍याने, हे पत्र जारी होण्यापूर्वी सादर केलेले प्रस्‍तावही रखडणार असून, गत शैक्षणिक वर्षाइतकीच प्रवेश क्षमता कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT