Nashik Accident Esakal
नाशिक

Nashik Accident : कारने गणेशमूर्ती नेणाऱ्यानेच दिली गणेश भक्तांना धडक ;चिमुकलीसह ६ जण जखमी

Chinmay Jagtap

Nashik Accident : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आज श्रीगणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. आज सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यात एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे, नाशिकमध्ये एका भरधाव चारचाकीने बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी निघालेल्या गणेश भक्तांना जोरदार धडक दिली आहे.

अधिक माहिती अशी की, मनमाडमध्ये बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी ५ ते ६ गणेशभक्त निघाले होते. मात्र या सर्वांना भरधाव चारचाकीने धडक दिली. यावेळी ते सर्वजण जखमी झाले. यात वाईट बाब म्हणजे जखमींमध्ये एका लहान मुलीचाही समावेश होता.

संबंधित धडक दिलेल्या कारचा वेग इतका होता कि, रस्त्यावर असलेल्या इतर ४ ते ५ दुचाकींचे देखील नुकसान या अपघातात झाले.

हा कार चालक नांदगावचा असल्याचे म्हटले जात असून तो गणेश मूर्ती घेऊन नांदगावकडे जात होता. यावेळी त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात आहे. जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोग आक्रमक, ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT