Accidental Vehicle esakal
नाशिक

Nashik Accident News : पांगरी शिवारात कारवर धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News : दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. (Nashik Accident Bike rider dies after hitting car in pangri area marathi news)

बाळू सोमनाथ काकड रा. निऱ्हाळे ता. सिन्नर असे अपघातातील मृताचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वावीहून सिन्नरच्या बाजूने जाणाऱ्या हुंडाई वेन्यू कार एम एच 15 बीपी 7122 वर पांगरी बाजूकडून वावीकडे चुकीच्या दिशेने भरधाव येणारी मोटरसायकल एम एच 15 बीपी 7152 धडकली.

ही धडक एवढी जोरात होती की कारच्या दर्शनी भागाची मोडतोड होऊन दुचाकीस्वार थेट काचेवर जाऊन आपटला. दर्शनी काच फुटून त्यात दुचाकी स्वाराच्या डोक्याचे केस अडकले. ही धडक झाल्यानंतर दुचाकीस्वार डांबरी रस्त्यावर उडून पडला. अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलीस ठाण्यातील हवालदार गोविंद सुर्यवाड, रुग्णवाहिका चालक शांताराम वारुळे क्रेन चालक किरण पाटील यांनी धाव घेतली. (Latest Marathi News)

गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वारास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सिन्नरला हलवण्यात आले. मात्र दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या अपघाताची माहिती समजल्यावर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.

सिन्नर शिर्डी महामार्ग चौपदरी झाला असून मधोमध डिव्हायडर टाकण्यात आला आहे. मात्र अनेक दुचाकीस्वार तसेच वाहनधारक शॉर्टकटच्या प्रयत्नात चुकीच्या लेन मधून वाहने चालवतात. आजचा अपघात देखील चुकीच्या लेन मधून दुचाकी चालवल्याने घडला. अनियंत्रित वेग देखील दुचाकी स्वाराच्या मरणास कारणीभूत ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर मित्रांसोबत गेलेला तरुण बेपत्ता; हुडी घातलेला संशयित कोण? घातपात की अपघात?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार

Maharashtra Latest News Live Update : नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी! गंगापूर धरण ९४% भरलं, पाण्याची टंचाई संपुष्टात

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली; एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रेयस अय्यरचा पुन्हा भ्रमनिरास! ODI कर्णधारपदाचे केवळ 'गाजर'; BCCI ने स्पष्ट केली भूमिका, इथेही शुभमन गिलला संधी...

SCROLL FOR NEXT