Angry villagers of Kakadgaon blocked road  esakal
नाशिक

Nashik Accident News : काकडगावजवळील रखडलेल्या पुलामुळे अपघात! 2 ठार, तर 3 गंभीर जखमी

Nashik News : नामपूर, मालेगाव रस्त्यावरील काकडगावनजीक गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाने दोन निष्पाप तरूणांचा जीव घेतला व दोन जण गंभीर जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

अंबासन : नामपूर, मालेगाव रस्त्यावरील काकडगावनजीक गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाने दोन निष्पाप तरूणांचा जीव घेतला व दोन जण गंभीर जखमी झाले असून संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी काकडगाव प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले व जोपर्यंत संबधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा संतप्त पवित्रा घेतला. (Accident due to stuck bridge near Kakadgaon)

मंगळवार (ता.११) रात्री साडे अकराच्या सुमारास मोराणे (ता.बागलाण) येथील भुषण प्रभाकर गांगुर्डे (वय ४२) रा. मोराणे (ता.बागलाण), दिनेश हिरामन रौंदळ (वय ४४) बिजोरसे (ता.बागलाण), वेदांत रामचंद्र शेवाळे (वय २८), कुदंन कृष्णा शेवाळे (वय २०) दोघे रा. मोराणे हे नामपूरहून मोराणेकडे जात असताना काकडगावनजीक रखडलेल्या पुलावर आले असता पिकअपने जोरदार धडक दिली.

यात भुषण गांगुर्डे व दिनेश रौंदळ यांचा जागीच मृत्यू झाला तर वेदांत शेवाळे व कुदंन शेवाळे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी दिनेश व वेदांत यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.

सकाळी नामपूर ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या पुलाचे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळेच रखडल्याने अपघात घडत असून सदर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी थेट ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे रास्ता रोखो आंदोलन छेडले आहे. (latest marathi news)

आंदोलनात काकडगाव, मोराणे, बिजोरसे, अंबासन, उत्राणे येथील ग्रामस्थ उपस्थित आहेत. जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले आहेत. 

रस्त्यावर पुलाची मागणी नसतांनाही पुल बांधकाम का केला. पुल केला पण चुकीच्या पध्दतीने केला असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यानी केला आहे. या पुलाची सखोल चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली आहे. जोपर्यंत दखल घेतली जात नाही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उपस्थिती आंदोलकांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT