MSRTC Bus Caught Fire esakal
नाशिक

Nashik Fire Accident: सिन्नर डेपोच्या बसला अचानक लागली आग अन केबिन जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरूप

Nashik News : शनिवारी सायंकाळी नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाट नजिक बसने अचानक आठ वाजेच्या दरम्यान पेट घेतला अन...

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाट नजिक अचानक बसने शनिवारी दि 23 सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत चालकाच्या केबिनने पेट घेतला. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. (Nashik Accident fire broke out in msrtc bus of Sinner Depot news)

या बाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहीती आशी की, सिन्नर डेपोची नाशिक ते सिन्नर सिन्नर बस क्रमांक एम एच 40 एन 94 21 ही सिन्नर नाशिक प्रवासी घेऊन नाशिक पुणे महामार्गावरून प्रवास करत होती. चालक, वाहक तसेच दहा प्रवासी बसमध्ये होते.

ही नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटाच्या अलीकडे बस आली असता चालक यांना अचानक बसच्या केबिन मधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गाडी रस्त्यावर उभी केली. सर्व प्रवाशांना खाली उतरवले, तोपर्यंत केबिन मध्ये पेट घेतला. फक्त 15 ते 20 मिनिटांत संपूर्ण केबिनला आग लागली व केबिन पूर्ण जळून गेल्याने तात्काळ सिन्नर एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडचे जवानांनी यांनी आग विझवण्यासाठी शेतीचे प्रयत्न केले.  (latest marathi news)

या घटनची माहिती मिळताच एमआयडीसी येथील फायर ब्रिगेडचे जवान तसेच सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशामकचे जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न करून आग आटोक्यात आली.

बसच्या संपूर्ण कॅबिनचे आगीत नुकसान झाल्याचे सूत्रांकडून समजते. घटनास्थळी मुसळगाव व सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस तसेच सिन्नर बस स्थानकाचे प्रमुख हे घटना स्थळी दाखल झाले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT