Nashik Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : मारोती व्हॅन- दुचाकीच्या धडकेमध्ये 1 ठार

सकाळ वृत्तसेवा

वणी : वणी- कळवण रस्त्यावर पायरपाडा गावाजवळ दुचाकी व मारुती व्हॅनच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (ता.२५) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान हा अपघात झाला.

रंगनाथ रामदास चारोस्कर (३५, रा. जोपूळ, ता. दिंडोरी) व त्यांच्याबरोबर असलेले धोंडीराम बाळू सताळे (३०, रा. देवपूर, निफाड) हे दोघे दुचाकीने (एमएच १५, एफ ई १४०२) नांदुरी गडाच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरुन येणारी मारोती व्हॅन (एमएच ०४, एफएफ १०४३) यांच्यात समोरासमोर धडक झाली.

मागे बसलेले सताळे यांनाही जोराचा फटका बसला. दुचाकीस्वार रंगनाथ चारोस्कर हा व्हॅनच्या काचेवर आदळून रस्त्यावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. जखमीला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने नाशिक येथे पाठविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळावर पोहचले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. वणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राऊत व भोये तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT