Nashik Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : भरधाव कारने पादचारी महिलेला चिरडले! बारदान फाट्यावरील घटना

Nashik News : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारदान फाटा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिला चिरडली जाऊन ठार झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आयुक्तालय हद्दीमध्ये भरधाव वाहनांची पादचारी, दुचाकीस्वारांना धडक देत अपघातांचे सत्र सुरूच आहेत. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारदान फाटा येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिला चिरडली जाऊन ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालकाला ताब्यात घेतले आहे. (woman was crushed to death by speeding car in Bardan Phata)

वैशाली ऊर्फ अर्चना किशोर शिंदे (३१, रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेजसमोर, गंगापूर शिवार) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. देवचंद तिदमे (रा. नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास मारुती अल्टो कारने (एमएच- ०३- बीई- ६६३४) पादचारी महिला शिंदे यांना जोरदार धडक देत चिरडले. (latest marathi news)

या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयित कारच्या क्रमांकावरून संशयिताचा शोध घेण्यात आला असता त्यावेळी तो पसार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT