Subhash Shirsath, Shubham Sonawane esakal
नाशिक

Nashik Accident : शुभम- सुभाषच्या निधनाने कुटुंबाचा आधारवडच हरपला!

Nashik News : येवल्याहून राजापूरकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

येवला : येवल्याहून राजापूरकडे मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातील जखमी दोन्ही तरुणांचे निधन झाले असून, गाव परिसरात यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील राजापूर येथील सुभाष शिरसाठ व शुभम सोनवणे हे तरुण सकाळी लवकर येवल्याला येऊन पुन्हा राजापूर येथे असलेल्या रसवंतिगृहासाठी बर्फ घेऊन जात होते. (Accidental death of two youths from Rajapur)

२१ मेस सकाळी पन्हाळपाटीजवळ अज्ञात वाहनाचा त्यांच्या मोटारसायकला धक्का बसला व मोटारसायकल मोरीवर आदळून या दोघांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. जखमी अवस्थेत त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही यश मिळाले नाही.

यातील जखमी सुभाष शिरसाठ याचे २५ मेस उपचार सुरू असतानाच निधन झाले होते. नाशिक येथे उपचार सुरू असताना शुभम सोनवणे याचा मृत्यू झाला. दोघेही अतिशय गरीब व सर्वसाधारण कुटुंबातील होते. शुभमचे वडील मृत असून, तो आपल्या कुटुंबातील कर्ता होता. आई, आजी यांचा सांभाळ तो करीत होता. (latest marathi news)

आईची रस्त्याच्या कडेला छोटी गोळ्या-बिस्किटांची टपरी असून, ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. वाहनांच्या टायरचे पंक्चर काढण्याचे काम व टपरी चालविण्याचे काम शुभम करीत होता. सुभाष शिरसाठ याची परिस्थिती बिकटची होती. सुभाष ऊसतोडणीसाठी बाहेरगावी मजुरी कामासाठी गेला होता व ऊसतोडणीचा हंगाम संपल्याने तो घरी आला होता.

हाताला काम नसल्याने त्याने राजापूर येथील बसस्थानकावर रसवंतिगृह सुरू केले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रसवंतिगृह टाकून करीत होता. या दोन्ही तरुणांवर कुटुंबांची जबाबदारी होती. त्यांच्या निधनाने राजापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT