crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सिनेस्‍टाइल पाठलाग करत सराईतांना अटक; गावठी कट्टा हस्‍तगत, गंगापूर पोलिसांची कामगिरी

Nashik Crime : शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली अन्‌ गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना गाडी थांबविण्यास सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली अन्‌ गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना गाडी थांबविण्यास सांगितले. पोलिसांना हुलकावणी देत सराईत सुसाट निघाले. पोलिसांनीही पाठलाग करत चौघा सराईतांना गजाआड केले. अगदी सिनेस्‍टाइल किस्सा गंगापूर रोड भागात घडला. गंगापूर पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत संशयितांकडून गावठी कट्टा हस्‍तगत केला आहे. (nashik accused arrested in Cinestyle chase )

इम्रान अयनुर शेख (२५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंक रोड, सातपूर), शेखर दिलीपराव कचले (२९, रा. शिवाजीनगर ता. सेलू जि. परभणी, अरबाज शब्बीर खान पठाण (२३, रा. डिग्रसवाडी, सेलू जि. परभणी) आणि राहुल श्याम क्षत्रिय (२४, रा.नांदूर नाका, पंचवटी) असे अटक केलेल्‍या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी (ता.१६) सराईत गुन्‍हेगार नाशिक शहराच्‍या दिशेने दाखल होत असल्‍याची माहिती हरसूल ठाण्याकडून मिळाली होती.

सराईत हे टोयोटो इनोव्हा कारमधून (एमएच२० सीए ९५९५) येत होते. गंगापूर गुन्हे शोध पथकाने या संशयितांच्‍या वाहनाच्‍या शोधार्थ गंगापूर जकात नाक्याचे पुढे नाकाबंदी केली. रात्री साडेआठच्‍या सुमारास कार येताना दिसली. त्या वेळी पथकाने वाहनचालकास थांबण्याचा इशारा दिला असता, चालकाने पळ काढण्याचा प्रयत्‍न केला. शासकीय वाहनाने वाहनाचा पाठलाग करताना गंगापूर गावाजवळील एसएसटी पॉइंटजवळ वाहन आडवे करत सराईतांच्‍या वाहनाला अटकाव केला.

यानंतरही सराईतांनी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली. यानंतर हरसूल पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले असता, सराईतांची अंगझडती घेत कारचीही तपासणी करण्यात आली. यात कारच्‍या शिटावर गावठी बनावटीचा कट्टा व एक पुंगळी मिळून आली. यानंतर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे.

गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, गणेश रहेरे, सचिन काळे, सचिन अहिरे, पोलिस नाईक विनायक आव्हाड, अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, रमेश गोसावी, सतीश जाधव, महिला अंमलदार अश्विनी खांदवे यांनी कामगिरी बजावली.

अन्‌ हवेत केला गोळीबार..

सराईतांनी हॉटेल कश्‍यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरून वाद घालत हॉटेल मालक व वेटर यांच्‍यावर गावठी कट्टा ताणत दहशत माजवली. हवेत तब्‍बल सात राउंड फायर करताना गोळीबार करून पसार झाले. या घटनेप्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यातही गुन्‍हा दाखल झाला आहे.

विविध ठाण्यांमध्ये गुन्‍हे

सराईत असलेल्‍या इम्रानविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात दोन, तर सेनगाव (हिंगोली) येथील पोलिस ठाण्यात एक गुन्‍हा दाखल आहे. सराईत शेखरविरुद्ध सेलू (परभणी) येथील पोलिस ठाण्यात दोन गुन्‍हे दाखल आहेत. तर राहुलविरुद्ध नाशिक शहरातील आडगाव पोलिस ठाण्यात दोन गुन्‍हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT