Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा! जिल्हा न्यायालयाने ठोठावला एक लाखांचा दंड

Crime News : आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला आयटी ॲक्टअन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर, हवालदार आजगे, दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडकोतील पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण करून शारीरिक संबंध केले आणि अश्लिल फोटो काढून ते सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १ लाखांचा दंड ठोठावला आहे. (Nashik accused in crime of torture sentenced to hard labour)

संजय बाबुलाल पाटणकर (पगारे) (रा. गणेश चौक, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. अंबड पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, पीडिता व आरोपी हे मुंबईच्या एकाच कंपनीत होते. या कंपनीची शाखा नाशिकला होती. आरोपी विवाहित असतानाही त्याने पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि तिला त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर नेले आणि शारीरिक संबंध ठेवले.

त्याचे फोटो त्याने मोबाईलमध्ये काढून त्याची सीडी तयार केली. नंतर पीडितेने काहीही अट न घालता आरोपीशी शारीरिक संबंध ठेवावेत यासाठी त्याने सदरची सीडी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची पीडितेला धमकी दिली होती. सदरचा प्रकार २००८ ते २०१० या दरम्यान घडला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात बलात्कारासह आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (latest marathi news)

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक छाया देवरे यांनी केला. सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायधीश एस.बी. कचरे यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी ११ साक्षीदार तपासले.

यात आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला आयटी ॲक्टअन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर, हवालदार आजगे, दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT