minor girl molstation esakal
नाशिक

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीची कोठडीत रवानगी

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील शिंपी गल्लीत शुक्रवारी (ता.७) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी मुलीच्या आई वडीलांच्या तक्रारीवरुन सिन्नर पोलिसांनी शिरीष बाबुराव गुजर (वय ५८) या संशयितास अटक केली. संशयितास आज (ता.८) रोजी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपीची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (ता.७) रोजी आरोपी शिरीष गुजर यांच्या शिलाई मशिन विक्रीच्या दुकानात शिलाई मशिनमध्ये टाकण्याचे तेल आणण्यासाठी गेली होती. तीने ३० रुपयांचे तेल विकत घेतल्यानंतर पैसे द्यायला दुकानाच्या काऊंटरकडे गेली असता संशयित आरोपी शिरीष गुजर यांने मुलीच्या अंगावरुन हात फिरवत तील लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार होत असतांना मुलीने घाबरुन घर गाठले. घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने सिन्नर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, हवालदार राहुल निरगुडे यांनी तातडीने संशयित आरोपी शिरीष गुजर यास अटक केली.

संशयित आरोपी जन्मठेप भोगलेला...

संशयित आरोपी शिरीष गुजर याला पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. काही वर्षांपूर्वीच ही शिक्षा भोगुन त्याने पुन्हा आपला शिलाई मशिन विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय शिंपीगल्लीत आपल्या राहत्या घरात सुरु केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT