Maharashtra Pollution Control Corporation esakal
नाशिक

Pollution Control Board : प्लॅस्टिक पिशवी प्रकरणी वर्षभरात 278 जणांवर कारवाई

Nashik News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेकडे वर्षभरात केलेल्या कारवाईचा अहवाल मागितल्यानंतर सादर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेकडे वर्षभरात केलेल्या कारवाईचा अहवाल मागितल्यानंतर सादर करण्यात आला आहे. वर्षभरात घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक पिशव्या तसेच वस्तूंचा साठा, विक्री व वापर करणाऱ्या २७८ जणांवर कारवाई केली त्यांच्याकडून १४.८५ लाख रुपये दंड वसुल करण्यात आला. (Action against 278 people in plastic bag case in a year)

एक हजार ८८५ किलो प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली. राज्यात प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंच्या उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी व साठवणूकीला बंदी आहे.

त्याचबरोबर केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने एकल वापर प्लॉस्टीच्या वापरावर बंदी घातली असून या अधिसूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिले. पथकांच्या माध्यमातून बसस्थानके, रेल्वेस्थानक, बाजारपेठा, महत्त्वाचे रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला तसे पत्र दिले. पत्रानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष पथके स्थापन केली. पथकांच्या माध्यमातून वर्षभरात २७८ जणांवर कारवाई करण्यात आली असून १४.८५ लाखांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रदूषण मंडळाकडे सादर करण्यात आली.

नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकचा वापर करू नये. कापडी पिशव्या वापराव्या, दुधासाठी देखील किटली सोबत न्यावी. प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह धरू नये असे आवाहन डॉ. पलोड यांनी केले.

प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेची कार्यवाही

- दोषी आढळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

- प्लॅस्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी फलकांची उभारणी

- प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय विशेष पथके

- कारवाईचा अहवाल दरमहा पर्यावरण विभागाला सादर होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT