Officials along with Nashik Guardian Minister Dada Bhuse during a meeting at the Thane Collector's Office to find a solution to the traffic jam on the Nashik-Mumbai highway. esakal
नाशिक

Nashik Traffic : 8 दिवसात वाहतूक सुरळीत न झाल्यास कारवाई; मुंबई- नाशिक महामार्ग वाहतुक कोंडीप्रश्‍नी बैठक

Nashik Traffic : आंदोलनाची दखल घेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सूचना दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic : मुंबई-नाशिक महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने तीन तासांचा प्रवास नऊ ते दहा तासांवर गेल्याने नाशिककर व मुंबई भागातील प्रवाशांच्या संतापाची तसेच राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आंदोलनाची दखल घेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सूचना दिल्या. ( Action if traffic is not smooth within 8 days )

आठ दिवसात वाहतूक सुरळीत झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे, महामार्गावर उड्डाणपुलाचे ठिकठिकाणी सुरू असलेले काम, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, अवजड वाहनांची ध्वनी गती, आसनगाव पासून पुढे सुरू असलेले समृद्धी महामार्ग विस्तारीकरणाचे काम यामुळे नाशिक मुंबई हा प्रवास शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास देणारा व प्रवाशांचा वेळ खाऊ ठरत आहे.

ज्या प्रवासाला तीन ते साडेतीन तास लागतात तिथे नऊ ते दहा तासांपर्यंत प्रवास गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. यासंदर्भात व्यापारी संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले होते. मात्र, आमदारांना वेळेत पोचता न आल्याने बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीला राजकीय वळण लागले.

विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र दखल घेतली गेली नाही. नागरिकांची अडचण व निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांचे वाढते आंदोलन मतपेटीतून व्यक्त होण्याची शक्यता लक्षात घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. २४) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते विकास महामंडळ, आरटीओ, रेल्वे विभाग तसेच महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. (latest marathi news)

बैठकीत विविध सूचना करताना वाहतूक सुरळीत झाल्याचे परिणाम दिसून आले नाही, तर त्या भागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मंत्री भुसे यांनी यांनी दिला. बैठकीत वडपे ते ठाणेपर्यंत २३ किलोमीटर व नाशिक ते वडपे या ९७ किलोमीटर रस्त्याबाबत नियोजन करण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजवणे, पुन्हा खड्डे होणार नाही याची काळजी घेणे, पूलांची चालू कामे लवकर मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.

वाहतुक कोंडी टाळण्यासाठी महत्वाच्या सुचना

- महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवा.

- आसनगाव रेल्वेपूलाचे काम प्रलंबित असल्याने अस्तित्वातील पुलाची दुरुस्ती.

- जिंदाल फ्लायओव्हर, परिवार गार्डन उड्डाणपुलाचे काम त्वरीत मार्गी लावावे.

- ईगतपुरी समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता तातडीने मार्गी लावावा.

- महामार्गावरील शहरांत जड वाहनांना वेळेचे बंधन.

- वाहतूक पोलिसांच्या मदतीला १७० पोलिस मित्र घेतले जाणार.

- जड वाहने दुसऱ्या, तिसऱ्या लेन मध्ये चालणार.

- हलक्या वाहनांसाठी महामार्गावरील पहिली लेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT