Nashik Crime esakal
नाशिक

Nashik Crime : रात्रीच्या वेळी वाहनांमधील इंधन चोरणाऱ्या टोळीला पकडले; स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Latest Crime News : मालवाहू ट्रक मधून इंधन चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी महामार्गावरील पाथरे फाटा येथून ताब्यात घेतले.

अजित देसाई

सिन्नर : रात्रीच्या वेळी महामार्गाच्या कडेला असणाऱ्या हॉटेल समोर किंवा पेट्रोल पंपांच्या परिसरात उभे असलेल्या मालवाहू ट्रक मधून इंधन चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी महामार्गावरील पाथरे फाटा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरली जाणारी दोन वाहने देखील जप्त करण्यात आली. सिन्नर शहर, औद्योगिक वसाहतींच्या परिसरात तसेच महामार्गांवर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांमधून इंधन चोरीची कबुली या टोळीकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Action of local crime branch team caught gang stealing fuel from vehicles at night )

गेल्या आठवड्यात सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकर नगर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभे असलेल्या ट्रकच्या डिझेल टॅंक मधून सुमारे दोनशे रुपये डिझेल व चालकाच्या केबिनमध्ये ठेवलेले 35 हजार रुपये चोरीला गेले होते. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता.

गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे यांना अहमदनगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार इंधन चोरी करण्यासाठी शिर्डी महामार्गाने येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री शिर्डी महामार्गावर पाथरे फाटा परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी बाजू कडून येणाऱ्या लाल रंगाची महिंद्रा केयूव्ही १०० कार (एमएच ०४/ जीएन ५७७७) व मारूती एर्टीगा कार (एमएच ०१ /सीएच ३४८६) कारची पोलीस पथकाने तपासणी केली.

या दोन्ही कारसह रोहन अनिल अभंग (२८) रा. देवाचा मळा, संगमनेर, वैभव बाबासाहेब सुरवडे (२५) रा. जामखेड, दादासाहेब दिलीप बावचे (२७) रा. बोधेगाव, ता. कोपरगाव या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांच्या विविध बनावट नंबर प्लेटसह साडेदहा हजार रुपयांची रक्कमही त्यांच्याकडे आढळून आली.

समाधान देविदास राठोड, रा. कोपरगाव व सचिन देविदास डाने रा. शिर्डी या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने सिन्नर शहर, डुबेरेनाका व मुसळगाव एम.आय.डी.सी. परिसरात रात्रीचे सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचे डिझेल टँकमधुन डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली या तिघांनी दिली.

सुमारे साडेबारा लाख रुपये किमतीचा जप्त केलेला मुद्देमाल व संशयित आरोपींना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदरची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये परतणार? चंद्रकांतदादांचे मोठे संकेत

Rajnath Singh : युद्ध सीमांपुरते मर्यादित नाही; नागपूरला आयुध उत्पादन प्रकल्पाचे उद्‍घाटन

बारामतीच्या बैठकीत निर्णय! साेलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; उपमुख्यमंत्री पवार, मोहिते-पाटलांसह चार आमदारांची उपस्थिती..

Pune Grand Tour 2026 : पुण्यात आज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रमुख मार्गांवर निर्बंध

Shivendraraje Bhosale: साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट पुतळा उभारणार: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; शहराच्या वैभवात भर पडणार!

SCROLL FOR NEXT