MSRTC bus esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : आंदोलकांसाठी धावल्या 20 बस! ‘लाल वादळ’गावाकडे, स्मार्ट रस्ता अखेर मोकळा

Nashik News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसांपासून ठिय्या मांडलेले आंदोलक घरी पोहोचल्यानंतर मंगळवारी (ता.५) स्मार्ट रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ दिवसांपासून ठिय्या मांडलेले आंदोलक घरी पोहोचल्यानंतर मंगळवारी (ता.५) स्मार्ट रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. महापालिकेने रात्रीतून या मार्गाची स्वच्छता केली. आंदोलकांना गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने रात्रीतून २० बस उपलब्ध करून दिल्यामुळे आदिवासी बांधवांची गैरसोय टळली. (Nashik Adivasi Morcha marathi)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी २६ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. सीबीएस ते अशोकस्तंभ हा रस्त्या वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद राहिला. रस्त्याच्या कडेला चुली मांडलेल्या होत्या.

भर रस्त्यावरच जेवणाच्या पंगती बसत. या मार्गावर जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वकिलांचे कार्यालय, विविध आस्थापना, शाळा, महाविद्यालये, बसस्थानके असल्याने गेल्या आठ दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून पायी चालणेही अवघड झाले. (Latest Marathi News)

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे व्यवसायही ठप्प झाल्याने प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी होत होती. अखेर सोमवारी सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मंत्री भुसे यांनी महापालिका आयुक्तांना या मार्गावर स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना हा रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार रात्रीच रस्त्याची सफाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT