Adivasi Morcha  esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : 8 दिवसात 225 पोती तांदळाचा भात; लाल वादळाच्या आंदोलनाला आठवडा पूर्ण

Adivasi Morcha : आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी आतापर्यंत २२५ पोती (२२५ क्विंटल) तांदळाचा भात शिजवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adivasi Morcha : वन जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी आतापर्यंत २२५ पोती (२२५ क्विंटल) तांदळाचा भात शिजवला आहे. कधी दाळ-भात, तर कधी खिचडी अन्‌ पांढऱ्या भातासोबत वांग्याची भाजी असे दररोज दोन वेळ जेवणासाठी सुमारे पाच हजार आंदोलकांना दिवसाला २५ पोती तांदूळ लागतो. (Nashik Adivasi Morcha marathi news)

अन्न शिजविण्यासाठी गावनिहाय ३८ चुली, गॅस शेगड्यांची व्यवस्था केलेली असून पुढील चार दिवस पुरेल एवढा लवाजमा आंदोलकांनी करून ठेवला आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावरील ‘स्मार्ट’ रस्त्यावर आंदोलकांनी गेल्या सोमवार (ता.२६) पासून दुतर्फा ठिय्या मांडला आहे. या सर्व आंदोलकांची तालुकानिहाय त्यांची हजेरी घेण्याची जबाबदारी माकप प्रणीत किसान सभा, सीटू, जनवादी महिला मंडळ, डीवायएफआय व एसएफआय या संघटनेचे सचिव व तालुकाध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे.

त्यांच्यावरच जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारीही आहे. प्रत्येक तालुक्यातून तांदूळ, बाजरी व नागलीच्या भाकरी, चटणी मागवली जाते. प्रत्येक आंदोलकाने पाच, दहा किलो तांदूळ जमा केले आहेत. यातून दररोजच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. साधारणतः: ५०० लोकांना एकवेळ जेवणासाठी ५० किलो तांदळाचा भात लागतो. दोन वेळेच्या जेवणासाठी अंदाजे तांदळाचा एक कट्टा रिकामा होत आहे.

रस्त्यावरच पंगती

अन्न शिजविण्यासाठी मांडण्यात येणाऱ्या चुलीचे दगड, लाकडी सरपणही त्यांनी गावाकडून आणले आहेत. ‘स्मार्ट रोडवर’च ३८ चुलींतून धुर निघतो, तर गॅस शेगडीचीही व्यवस्था केली आहे. रस्त्यावरच पंगती बसतात. पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था महापालिकेने चोख बजाविली आहे. ‘वॉटरग्रेस’चे १६ स्वच्छतादूत येथे साफसफाई करत असल्याने परिसर स्वच्छ राखला जात आहे.

तुटवडा भासताच मागणी

आंदोलकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवताच दोन व्यक्तींना गावाकडे पाठवून पुरेसे तांदूळ, मीठ, मिरची मागवली जाते. भाजीपाल्याची खरेदी नाशिक बाजार समितीतून होते. तर नांदगाव, येवला या भागातील लोकांनी बाजरी, ज्वारी व नागली पीठच सोबत आणले आहे. त्याच्या भाकरी बनवतात. पुढील चार दिवस पुरेल एवढा साठा आंदोलकांनी करून ठेवला आहे. याची वेळोवेळी खातरजमा करून घेतली जाते.

गाव, तालुकानिहाय जबाबदारी

गाव-खेड्यातून पायी चालत आलेल्या आंदोलकांची जबाबदारी प्रत्येक गावच्या एका व्यक्तीवर निश्चित करून देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला अडचण भासल्यास ते तालुकाध्यक्षांशी संवाद साधतात. तालुकाध्यक्ष जिल्हासचिव व अध्यक्षांकडे मागणी करतात. याप्रमाणे प्रत्येक गावाचे व तालुक्याचे नियोजन केले आहे. त्या-त्या गावचे, तालुक्याचे लोक त्याच ठिकाणी मुक्कामही करतात.

''प्रत्येक गावातून आलेल्या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था संघटनेचे तालुका सचिव, अध्यक्ष करतात. त्यांना येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवितो. आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने त्वरित अंलबजावणी सुरु करावी.''- इंद्रजित गावित, जिल्हाध्यक्ष, माकप

''गावनिहाय नियोजन केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देणे शक्य होते. दोन वेळ जेवण, झोपण्याची व्यवस्था असल्यामुळे आंदोलन व्यवस्थित सुरु आहे. प्रत्येक तालुका आणि आंदोलकांवर आम्ही लक्ष ठेवतो. त्यांच्या सूचना व समस्या तातडीने मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे.''- रमेश चौधरी, जिल्हासचिव, किसान सभा (latest marathi news)

''आमच्या शब्दावर गावातून थेट जिल्ह्यापर्यंत आलेल्या प्रत्येक आंदोलकांची काळजी आम्ही घेतो. आठ दिवसांपासून आम्ही फक्त भातच खात असल्यामुळे आता जेवणाची भूक दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. चार दिवस पुरेल एवढे अन्नधान्य आम्ही साठवून ठेवले आहे.''-भिका राठोड, जिल्हासचिव, माकप

''आंदोलकांना अंघोळ व शौचास जाण्याची अडचण भासते. त्यादृष्टीने आम्ही मागणी केल्याप्रमाणे टॉयलेट मिळाल्याने ही अडचण दूर झाली. अन्नधान्य पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''- अप्पा वटाणे, जिल्हा सचिव, डीवायएफआय

''आंदोलक महिलांना येणाऱ्या अडचणी आम्ही प्राधान्याने सोडवितो. ग्रामीण भागातील महिला जास्त बोलत नाहीत. पण आमच्याशी त्यांनी संवाद साधल्यानंतर त्यांच्या अडचणी आमच्या लक्षात येतात. स्वयंपाकात त्यांची फार मोठी मदत होते.''-निर्मला चौधरी, जिल्हाध्यक्ष, जनवादी महिला संघटना

''गावाकडच्या व्यक्तींना वेगवेगळ्या सवयी असल्यामुळे त्यांना सांभाळणे कठीण आहे. पण आम्ही योग्यप्रकारे त्यांना सांभाळत आहोत.''-उत्तम कडू, जिल्हा समिती सदस्य, माकप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT