Admission  esakal
नाशिक

Nashik News : मागसवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

Nashik News : मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यापासून वसतिगृहातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यापासून वसतिगृहातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. इच्‍छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन विभागातर्फे केले आहे. (Admission to hostel for backward class girls has started)

इच्छुकांनी प्रवेश अर्ज नाशिक-पुणे महामार्गावरील सामाजिक न्याय भवन परिसरातील गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह येथून प्राप्त करून १५ जुलैपर्यंत भरलेले परिपूर्ण अर्ज वसतिगृह युनिट क्रमांक चार येथे जमा करावे. सर्व मागासवर्गीय विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह (जुने) चे गृहपाल एस.बी गवारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, रहिवासी दाखला, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती, गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशन कार्ड प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. (latest marathi news)

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ही मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक ४, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह नाशिक व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) नाशिक या तीनही वसतिगृहातील रिक्त झालेल्या जागांसाठी असल्‍याचे कळविले आहे.

रिक्त जागा

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक ४ येथे एकूण ३४ जागा उपलब्‍ध असून, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह येथे एकूण ५६ जागा, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) नाशिक येथे एकूण ३० जागा उपलब्‍ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT