Dr. Raman Puri esakal
नाशिक

Lipid Profile Test : लिपिड प्रोफाइल तपासणी विशीतच करा : डॉ. रमण पुरी यांचा सल्ला

Latest Health News : कोलेस्‍टरॉलच्‍या स्‍तराबाबत भारतीय मानकांचा विचार करून उपचार दिल्‍यास हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण घटविणे शक्‍य आहे, असे मत लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केले.

अरुण मलाणी

नाशिक : हृदयविकार व त्‍यामुळे होणारे मृत्‍यूंचे प्रमाण भारतात गंभीर आहे. अमेरिकेपेक्षा चारपटीने, चीनपेक्षा सात, तर जपानपेक्षा वीसपटीने भारतात हृदयरोगाचे प्रमाण अधिक आहे. ‘एलडीएस कोलेस्‍टरॉल’ हा अतिरेक्‍याप्रमाणे घातक आहे. कोलेस्‍टरॉलच्‍या स्‍तराबाबत भारतीय मानकांचा विचार करून उपचार दिल्‍यास हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण घटविणे शक्‍य आहे, असे मत लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्‍थापक अध्यक्ष डॉ. रमण पुरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केले. (Lipid profile test should be done at 20)

वयाच्‍या विशीत लिपिड प्रोफाइल तपासणी झाल्‍यास प्राथमिक स्‍तरावर हृदयविकारावर उपचार करणे शक्‍य होईल, असे डॉ. पुरी यांनी आवर्जून नमूद केले. हृदयविकार दिनानिमित्त होणाऱ्या परिषदेसाठी आलेल्‍या डॉ. पुरी यांनी ‘सकाळ’सोबत संवाद साधला. ते म्‍हणाले, की पाश्चात्त्य देशांच्‍या तुलनेत भारतात दहा वर्षआधीच हृदयविकार उद्‌भवतो आहे.

हृदयविकाराच्‍या झटक्‍याने दगावणारे २५ टक्‍के रुग्‍ण चाळीसपेक्षा कमी वयाचे असतात. ५० टक्‍के रुग्‍ण ५० पेक्षा कमी वयाचे असतात. युरोपचा विचार केल्‍यास हृदयविकाराने झालेल्या मृत्‍यूत ९० टक्‍के ६५ वर्षांवरील रुग्‍ण असतात. याचे प्रमुख कारण म्‍हणजे ‘एलडीएल कोलेस्टरॉल लेव्‍हल’ भारतीयांची तुलनेने कमी असली तरी, ही पातळी जीवघेणी ठरत आहे. पाश्चात्त्य मानकांपेक्षा भारतीय मानकांमध्ये हा स्‍तर आणखी कमी ठेवणे गरजेचे आहे.

‘त्यां’ची तपासणी दुसऱ्या वर्षी व्‍हावी

वयाच्‍या २० व्‍या वर्षी लिपिड प्रोफाइल तपासली गेल्‍यास भविष्यातील धोक्‍याबाबत सतर्क होऊ शकतो. त्‍यामुळे मुले-मुली महाविद्यालयात गेल्‍यास त्‍यांची तपासणी करणे सक्‍तीचे झाले पाहिजे. ज्‍या बालकांच्‍या कुटुंबात हृदयविकार आनुवंशिक आहे, अशा बालकांची तर वयाच्‍या दुसऱ्या वर्षी तपासणी व्‍हावी व त्‍याच्‍या कोलेस्टोरलच्‍या आधारे उपचाराची दिशा ठरवत संभाव्‍य धोका टाळणे शक्‍य होईल.

लिपिड क्‍लिनिकची आवश्‍यकता

प्रत्‍येक खासगी, शासकीय रुग्‍णालयात लिपीड क्‍लिनिक उभारणे गरजेचे आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला सुचविले होते. याबाबत डॉ. हर्षवर्धन केंद्रीय आरोग्यमंत्री असताना त्‍यांनी तज्‍ज्ञ समितीदेखील गठीत केली होती. परंतु त्‍यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. अमेरिका व युरोपात लिपिड क्‍लिनिकची संकल्‍पना प्रचलित आहे. त्याच धर्तीवर भारतातही प्रत्‍येक रुग्‍णालयात हा कक्ष स्‍थापन व्‍हावा, असेही डॉ. पुरी म्‍हणाले. (latest marathi news)

संशोधनाला सकारात्‍मक परिणाम

लिपिड असोसिएशनद्वारे भारतीय मानकांच्‍या आधारे उपचार करताना १२० रुग्‍णांची निरीक्षणे नोंदविली जात आहेत. मृत्‍यूदर घटल्‍याचे निरीक्षण असून, एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्‍यास ठोस संशोधन मांडता येईल, असेही डॉ. पुरी म्‍हणाले.

हृदयरोग टाळण्याासाठी सल्‍ला...

- आहारात फळांचे प्रमाण वाढवावे, पौष्टिक आहारावर भर

- वजन नियंत्रणात ठेवावे, सुदृढ जीवनशैली महत्त्वाची

- एकदा तळल्‍यानंतर तेलाचा पुनर्वापर सक्‍तीने टाळावा

- धावण्यापेक्षा जलद गतीने चालण्याचा व्‍यायाम उपयुक्‍त

- प्रतिव्‍यक्‍ती तेलाच्‍या सेवनाचे प्रमाण तीन चमच्‍यापर्यंतच असावे

- हिवाळ्यात सकाळी वॉक टाळावा, दुपारी जेवणापूर्वी चालणे उत्तम

- लिपिड प्रोफाइलद्वारे स्‍तर जाणून घेत उपाययोजना कराव्‍यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: परळीत आणखी एक खून प्रकरण! बालाजी मुंडेंची हत्या कुणी केली? खरा खुनी सोडून ड्रायव्हरला केलं आरोपी; धसांचा गौप्यस्फोट

Pro Kabaddi 12 Schedule: प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर! 'या' चार शहरांमध्ये रंगणार लढती

IND vs ENG 5th Test: 0.00305%: भारतीय संघाने असा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, जो आता तुटणे जवळपास अशक्यच...

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : धाराशिवच्या महिला रुग्णालयात शिरला साप

SCROLL FOR NEXT