Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : 2 महिन्यांनी जि. प. चे विभागप्रमुख फिल्डवर

Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना फिल्डवर उतरवत तालुक्यांना बैठका घेण्याचे आदेश काढले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना फिल्डवर उतरवत तालुक्यांना बैठका घेण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी सर्व पालक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तालुक्यात जाऊन बैठका घेत, कामकाजाचा आढावा देखील प्रशासनाकडे सादर केला होता. मात्र त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हा बैठकांकडे त्यांनी पाठ फिरविली. (Nashik After 2 months ZP Head of Department on field marathi news)

प्रशासनाला आता पुन्हा जाग आली असून, बुधवारी (ता. २०) सर्व विभागप्रमुख फिल्डवर होते. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत कार्यालयीन वेळात कर्मचाही हजर नसल्याचे निदर्शनास आले होते. हा विषय जिल्हाभर गाजला होता. त्या वेळी श्रीमती मित्तल यांनी मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांची प्रत्येक तालुक्यास ‘तालुका पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक करत बैठका घेण्याचे फर्मान काढले होते. (latest marathi news)

जानेवारीमध्ये तालुका पालक अधिकाऱ्यांना बैठकांचा विसर झाला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्हा दौरा असल्याचे कारण पुढे केले होते. फेब्रुवारी महिन्यातही अधिकारी तालुक्यांना गेले नव्हते. जिल्हा परिषद अध्यक्ष करंडक स्पर्धा, अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धा, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कामांची लगीनघाई यामुळे फिल्डवर गेले नसल्याचे सांगितले जात होते. प्रामुख्याने निधी खर्च वेळात व्हावा, यासाठी प्रशासनाकडून तालुक्यांना पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT