Sudam Demse, Sanjay Navale, Trimbak Kombe, Sunil Kothmire, Madan Demse, Dhananjay Gawli, Darshan Ladda while presenting the complaint booklet to Satish Meher.
Sudam Demse, Sanjay Navale, Trimbak Kombe, Sunil Kothmire, Madan Demse, Dhananjay Gawli, Darshan Ladda while presenting the complaint booklet to Satish Meher. esakal
नाशिक

Nashik News : 20 वर्षानंतर पाथर्डीला अधिकृत तक्रार क्रमांक

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : वीज वितरण कंपनीतील पाथर्डी विभागाला गेल्या २० वर्षापासून प्रतीक्षा असलेला २४ तास तक्रार करण्यासाठी ७८७५७६०६७८ हा अधिकृत क्रमांक मिळाल्याने स्थानिकांतर्फे अधिकाऱ्यांचे आभार मानत कार्यालयाला तक्रार पुस्तिका भेट देण्यात आली. वीजपुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी अधिकृत क्रमांक नसल्याने ग्राहकांची फजिती होत होती.

सदर बाब माजी लोकप्रतिनिधींनी मुख्य अभियंता यांच्याकडे मांडली. त्याची दखल घेत पाथर्डी विभागात २४ तास कार्यरत असणारा तक्रार क्रमांक मिळाला. ग्राहकांनी मुख्य अभियंता यांचे पत्राद्वारे आभार मानले. सहायक अभियंता यांना तक्रार नोंद पुस्तिका भेट देण्यात आली. (Nashik Pathardi complaint number mahavitaran marathi news)

महावितरण कंपनीच्या पाथर्डी विभागात विजेच्या समस्या मांडण्यासाठी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी २४ तास तक्रार क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार क्रमांक देण्यात यावा ही मागणी शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), भाजप, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, समाजसेवक व ग्रामस्थांनी मांडली होती.

सदर मागणीचा सकारात्मक विचार मुख्य अभियंता यांनी केला. यामुळे पाथर्डी गाव, वडनेर गाव ते विल्होळी, रायगडनगर या परिसरातील ३४ हजार ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. (Latest Marathi News)

माजी नगरसेवक सुदाम डेमसे, संजय नवले, त्र्यंबक कोंबडे, मदन डेमसे, सुनील कोथमिरे, तानाजी गवळी, खंडू पाटील, संजय जाचक, दत्ता डेमसे, धनंजय गवळी, विकी कांडेकर, प्रमोद गवळी, गणेश चौधरी, मनोज गोवर्धने, जितेंद्र चोरडिया, सुदाम जाचक, दर्शन लड्डा आदी या वेळी उपस्थित होते.

"७८७५७६०६७८ हा २४ तास कार्यरत असणारा तक्रार क्रमांक असून, मुख्य अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवा पुरवण्यासाठी व तक्रार तत्काळ सोडवण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध आहे."- सतीश मेहेर, सहाय्यक अभियंता, पाथर्डी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT