Assembly Constituency  esakal
नाशिक

Nashik Assembly Constituency : पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्याचा शोध; जुन्या- नव्या उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग

Nashik News : लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे.

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विकासापासून नेहमीच वंचित असणाऱ्या खानदेश पट्ट्यातील कामगारबहुल नागरिक आता नाशिक पश्चिम विधानसभेसाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याच्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. त्यामुळे या वेळी पश्चिम मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. (Nashik Assembly Constituency)

उमेदवारी निश्चित करण्याअगोदर आता जुन्या व नव्या उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येत आहे. परंतु पक्षश्रेष्ठी व नागरिक मात्र नवीन चेहऱ्याच्या शोधात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये सिडको, सातपूर, इंदिरानगर, गंगापूर रोड, अंबड, पाथर्डी, गोविंदनगर, चुंचाळे आदी भागांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास पाच लाखाच्या आसपास लोकसंख्या येते.

नाशिक पश्चिम हा परिसर खानदेशबहुल पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेष करून धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव व स्थानिक रहिवाशांचा सामावेश असल्याचे दिसून येते. या ठिकाणी कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सणाच्या दिवशी मांडे व पुरणपोळीला विशेष महत्त्व आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहे. एवढेच नव्हे तर अंबड, सातपूर व चुंचाळे परिसरामध्ये यूपी, बिहार व मध्य प्रदेश येथील परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. या भागातील बहुसंख्य नागरिक हे अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये काम करताना दिसतात. (latest marathi news)

समस्या जैसे थे

आतापर्यंत या परिसरामधून भाजप, काँग्रेस, मनसे डॉ. डी. एस. आहेर, डॉ. शोभा बच्छाव, नितीन भोसले तर सध्या सीमा हिरे या आमदार झाल्या आहे. यापैकी दोन जण मंत्री झाले आहेत. यापैकी एकही या विधानसभा परिसरामध्ये राहत नाही. एवढेच नव्हे तर या मतदारसंघाशी त्यांचा फारसा काही काडीमात्र संबंधही नव्हता.

तरीदेखील या सर्वांची लॉटरी लागली हे विशेषच म्हणावे लागेल. आजही या मतदारसंघात बेरोजगारी, घर, रस्ते, पाणी, गार्डन, मैदान, भूमिगत तारा, सिडकोची घरे फ्री टू लिज होम, चुंचाळे पोलिस ठाणे, सेंट्रल पार्क, नवीन उद्योगधंदे, गुन्हेगारी मुक्त परिसर आदी समस्यांच्या जैसे थे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT