It was drizzling in the city on Monday. Motorists driving in this rain. esakal
नाशिक

Nashik Monsoon : प्रदीर्घ विश्रांतीनंतर वरुणराजा बरसला; दिवसभर रिपरिप

Nashik Monsoon : रविवारी (ता. २१) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon : प्रदीर्घ विश्रांतीनंतर नाशिक शहर व जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. रविवारी (ता. २१) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शासकीय कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची दिवसभराच्या रिमझिम पावसामुळे तारांबळ उडाली. दरम्यान, दिवसभरात १७.७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. (After long time rain in city )

त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी या धरणांच्या तालुक्यात दिवसभर पाऊस पडल्यामुळे धरणसाठ्यात अल्पशी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. त्यांना काही प्रमाणात दिलास मिळाला. मात्र, सोमवारी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण, सुरगाणा या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

नाशिक शहर व परिसरातही रिमझिम पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे नागरिकांची चांगलिच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. घराबाहेर पडलेल्या नागरिकांना छत्री, रेनकोटच्या साह्याने प्रवास करावा लागला. तर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. (latest marathi news)

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पावसात भिजावे लागले. तर बेघर नागरिकांनी उड्डाणपुलाचा आश्रय घेतला. दिवसभराच्या रिपरिप पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी थंडी वाढल्याचे जाणवले.दरम्यान, येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ठिकठिकाणी पाणी साचले

नाशिक शहर व परिसरात सोमवारी (ता.२२) सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेनंतर मात्र चांगलाच जोर धरला. या पावसामुळे शहरातील नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, सिडको परिसरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. दिवसभर संततधार सुरु होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. त्यातच दुपारी पावसाने जोर धरल्याने शाळकरी मुलांचे चांगलेच हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

Latest Marathi News Live Update: रोहित शेट्टी फायरिंग प्रकरण चार महिन्यापासून फरार आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

अमरावती प्रकरणात फक्त दोन मुलींचे व्हिडीओ; अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात धक्कादायक माहिती, नवनीत राणांनाही फटकारलं...

Black Magic Scam : 'तुझ्या दीराचा आत्मा घरात आहे..'; भीती दाखवून महिलेला भारत-पाक सीमेपर्यंत नेलं, भोंदूसह पोलिस पत्नीचा अजब कारनामा, 11 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT