Khamkheda Bhausaheb Deore with double crop of coriander here. esakal
नाशिक

Nashik Agricultural Success: खामखेड्यात उत्पादनखर्च शून्य, उत्पन्न मात्र चाळीस हजारांचे! कोथिंबिरीच्या दुबार पिकाचे कौतुक

Agriculture News : सध्या कोथिंबीर पिकास अल्प भाव असला तरी शून्य उत्पादनखर्चात कमी दिवसांत पिकातून पैसा झाल्याने या दुबार पिकाच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : खामखेडा येथे कोथिंबिरीचे दुबार (खोडवा) पीक घेत शून्य उत्पादनखर्चात शेतकऱ्याला ३५ ते ४० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या कोथिंबीर पिकास अल्प भाव असला तरी शून्य उत्पादनखर्चात कमी दिवसांत पिकातून पैसा झाल्याने या दुबार पिकाच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Nashik Agricultural Khamkheda Appreciation of double cropping of coriander)

देवळा व कळवण तालुक्याच्या गिरणा नदीकाठावरील गावांमध्ये दर वर्षी जून, जुलै या महिन्यांत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी कोथिंबिरीची लागवड करतात. या वर्षी कमी पाण्यामुळे जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार असल्याने या पिकाने लखपती केले.

खामखेडा येथील शेतकरी भाऊसाहेब उमाजी देवरे यांनी देखील एक एकर क्षेत्रात २८ किलो बियाण्यांपासून जवळपास दीड लाखाची कमाई काढली. कोथिंबीर काढणीनंतर याच पिकात पाऊस सुरू झाल्याने नांगरट न झाल्यामुळे कोथिंबीर काढलेल्या शेतात पुन्हा कोथिंबीरने फुटवा केला. पुन्हा शेत नांगरण्यापेक्षा हा फुटवा शेतकऱ्याने धरल्याने सध्या हे दुबार पीक काढणीला आले आहे. (latest marathi news)

पहिल्या टप्प्यात दीड लाखाची झालेली कमाई मात्र सध्या कोथिंबिरीला अल्पसा भाव आल्याने याच क्षेत्रात जवळपास ३५ ते ४० हजार रुपये या शेतकऱ्याला मिळवून दिले आहेत. प्रथमतः पीक घेतले, त्यावेळेस २८ किलो बियाणे त्याचबरोबर मशागत यासाठीचा झालेला खर्च, मात्र दुबार पीक घेताना शून्य खर्च झाल्यामुळे आलेले सर्व उत्पादन नफ्याच्या स्वरूपात राहिल्याने त्यांच्या या दुबार पिकाच्या प्रयोगाचे खामखेडा व परिसरातील शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे. सध्या कोथिंबिरीला कमी भाव असला तरी खर्च न झाल्याने येणारा पैसा हा नफाच ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Garje Case : गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात धक्कादायक दावा ! दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडताच नवऱ्याने स्वत:वर ब्लेडने वार केले अन्...

Crime News : चाकूचा धाक दाखवत अपहरण केलं, नंतर सोशल मीडियावर VIDEO व्हायरल केला; लेडी गँगची दहशत समोर...

Latest Marathi News Live Update : स्मृती मानधनाच्या लग्नातच विघ्न...नातेवाईकाला अचानक हार्ट अटॅक; सोहळा रद्द होण्याची चर्चा

Delhi Car Blast Case: ‘अल फलाह’चे दहशतवादी कनेक्शन; साखळी बाँबस्फोटांतील आरोपी हा माजी विद्यार्थी

Washim News : 'तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहे' म्हणत जवळ घेतलं अन्...; शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT