Baragaonpimpri (T.Sinnar) intercropping monsoon groundnut and sunflower in farmer Anawat's field on Sinnar-Niphad road in Shiwarat. esakal
नाशिक

Nashik Agriculture News: बारागांवपिंप्री येथे भुईमूगात घेतले सूर्यफुलाचे आंतरपीक!

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी : बारागांवपिंप्री येथील शेती शिवारात भुईमुगात आंतरपीक म्हणून पावसाळी सूर्यफूल बहरले आहे. सिन्नर- निफाड रस्त्यालगत बहरलेले सूर्यफूल पाहून सेल्फी विथ सूर्यफुलांचा मोह आवरत नाही.

बारागांवपिंप्रीसह सुळेवाडी, पाटपिंप्री, निमगाव, गुळवंचसह परिसरात बदलत्या काळानुसार शेतपिकांत बदल झाला.

शेती शिवार सिंचन वाढल्याने गावठी भुईमूग, घुगरी, सूर्यफूल, करडईचे वाण कुणीही करत नव्हते. (Nashik Agriculture News Intercrop of sunflower grown in groundnut at Baragaonpimpri)

जिरायती शिवारामुळे आता तेलबियांना प्राधान्य दिले जात आहे. बारागांवपिंप्रीच्या शेतकरी अनवट यांनी शेतात भुईमूग व सूर्यफूल दोन्ही तेलबिया पिके आंतरपिके पद्धतीने केले आहे. त्यांनी भुईमुगाच्या सरींमध्ये सूर्यफूल घेतले आहे.

जून महिन्यात दोन्हीची लागवड केली. पण खरीप हंगामात पाऊस नसल्याने मध्यंतरी पिके करपली. त्यात सूर्यफुलाने मान टाकली होती. पण नुकत्याच झालेल्या पावसाने ही पिके तरारली आहेत.

बारागावपिंप्रीला ज्या शेतकरी बांधवांनी भुईमूग घेतला आहे, त्यांनी त्यात गावठी सूर्यफुलांच्या बी सरींवर टाकल्या आहे. पावसाने दोघांना जीवनदान मिळाल्याचे शेतकरी रमेश जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT